देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस

Update: 2022-08-07 06:20 GMT

राज्यात मागच्या महिनाभरात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० हुन अधिक आमदार घेऊन नवीन गट स्थापन केला. आणि त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या राजकारणात जे काहीच झालं ते आता सर्वाना माहीतच आहे. याच सगळ्या राजकीय घटनांवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. त्या एका टीव्ही कार्यक्रमात सभागी झाल्या होत्या. याच कार्यक्रमात त्यांना देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना त्यांनी अत्यंत भन्नाट उत्तर दिल आहे.

अमृता फडणवीस यांना असा प्रश्न विचारल्यानंतर त्या थोड्या गोंधळल्या त्यानंतर त्यांनी उत्तर देताना म्हंटल की, माहिती नाही. ते मुख्यमंत्री होतील, हेच मला कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे पंतप्रधान तर वाटूच शकत नाही. सध्या नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणीही देशासाठी चांगले नाही हे मला समजतंय. पुढे १० ते २० वर्षे गेल्यानंतर तेव्हा त्या पदासाठी कोण पात्र असेल हे मी आताच सांगू शकत नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होतील की नाही हे मला माहिती नाही", असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच अगदी बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या याच बिनधास्तपणे बोलण्याने त्यांना समाजमाध्यमांवर अनेक वेळा ट्रोल देखील केलं जातं. पण या ट्रॉलर्सना कसल्याच प्रकारे न जुमानता त्या नेहमी आपली भूमिका मांडत असतात.

या कार्यक्रमांत अमृता फडणवीस यांना साध्य राज्यात सुरु असलेल्या राजकीय घटनांपासून ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश विचारण्यात आले आहेत. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी तसेच अनेक सिने कलाकार हजेरी लावत आहेत. अभिनेता सुबोध भावे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस साह्भागी झाल्या होत्या.

Tags:    

Similar News