देवेंन्द्र फडणवीस यांचा थेट अमित शहा यांच्याशी पंगा..

Update: 2022-07-06 06:21 GMT

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन झाल्याने अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सगळं अलबेल नसल्याचे समोर आले. त्यानंतर नागपुरमध्ये लागलेल्या बॅनरवरून अमित शहा यांचे फोटो गायब झाले होते. त्याची चर्चा राज्यात रंगली होती. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच काल नागपुरमध्ये भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापार्श्वभुमीवर या रॅलीतील बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो नसल्याचे दिसून आले.

देवेंद्र फडणवीस यांच्या डिमोशननंतर नागपुर महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी बॅनर लावले होते. मात्र त्या बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो गायब केला होता. तर त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांचे फोटो छापण्यात आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत रॅलीच्या रथावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेच फोटो छापण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवर भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले अमित शहा यांचा फोटो मात्र छापण्यात आला नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे डिमोशन करण्यात अमित शहा यांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळे अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून गायब करण्यात आला आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थेट अमित शहा यांच्याशी पंगा घेतला असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे. नागपुर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. तर भाजप ही आरएसएसची राजकीय विंग असल्याचे म्हटले जाते. मात्र याच नागपुरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरून अमित शहा यांना वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.




 


Tags:    

Similar News