उत्तर प्रदेश मध्ये लोकशाहीचा मळा फुलतो का? महिला अत्याचारावरून उद्धव ठाकरे यांचा राज्यपालांवर निशाणा..

Update: 2021-10-15 14:29 GMT

शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यातून विरोधकांवर निशाणा साधला. याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. महिलांवरील अत्याचार वाढतायत. राज्यपालांनी मला पत्र पाठवले. त्यावेळी जी घटना घडली ती निदनिय अशीच आहे. राज्यपालांनी विधानसभेचे 2 दिवसांचे अधिवेशन घेण्यासाठी सांगितले होते. त्यांना मी नम्रपणे सांगितले होते, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे माता भगिनींनी मान-सन्मान कसा करायचा याची शिकवण आम्हाला आहे. परंतु तरीही आशा घटना इथे घडत आहेत. त्यांना आम्ही क्षमा दाखवणार नाही. घटना घडल्यानंतर अर्ध्या तासात नराधमाला अटक करण्यात आली. त्याला फाशीची शिक्षा देखील होईल. महिलांवरील अत्याचार आता देशभर वाढत आहेत. आपली संस्कृती एक आहे. आपलं हिंदुत्व एक आहे. विधानसभेच्या अधिवेशनाऐवजी राज्यपालांनी नरेंद्र मोदी यांना सांगून संसदेचं आठवडाभर अधिवेशन घ्यावे. देशातील सर्व लोकप्रतिनिधी येथील आपापल्या राज्यातील गोष्टी सांगतील. मात्र फक्त चर्चा न करता तोंडाची वाफ न करता यावरती काय करू शकतो हे ठरवले गेले पाहिजे.

एखादी घटना घडल्यानंतर अश्रू ढाळायचे आणि निघून जायचं असं नको. काय करायचं सांगा. घटना घडल्यानंतर काही करण्याऐवजी घटना घडणार नाही यासाठी काय करायचं यासाठी देशात काहीतरी चांगलं करू. महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. महाराष्ट्रात काही घडलं की गळा काढला जातो लोकशाहीचा खून झाला म्हणून. महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढत असाल तर उत्तर प्रदेश मध्ये काही लोकशाहीचा मळा फुलतो आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. देशभर थैमान घालत असलेल्या कोरोणामुळे दरवर्षी शिवाजी पार्क येथे होणारा हा दसरा मेळावा मागच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता मात्र सध्या राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याने मर्यादित उपस्थितीमध्ये हा मेळावा या वर्षी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:    

Similar News