Chitra Wagh ; कोल्हापूरात चित्रा वाघ यांच्यावर दगडफेक

सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. कोल्हापूर येथील प्रचार सभेत बोलताना दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

Update: 2022-04-03 19:46 GMT

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे. प्रचार सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप करू लागल्या आहेत.भाजपनं (BJP) कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपने या ठिकाणी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. काल सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. कोल्हापूर येथील प्रचार सभेत बोलताना दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून काय म्हंटल आहे पाहुयात..

" वाह रे बहाद्दरांनो…, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर (Kolhapur by election) उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन केला आहे. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा. असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा" असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.


चित्रा वाघ यांनी ट्विट करत, सभेत बोलत असताना दगड मारण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी त्यांनी समोर यायची हिम्मत नाही तर सभेत दगड मारता असं म्हणत तुमची दहशद गुंड, बलात्कार करणार्यांवर दाखवा असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा असा इशारा देणारं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे

चित्रा वाघ आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात गेले होत्या कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी सक्षम महिला, सक्षम देश या पत्रकाचे प्रकाशन करुन कोल्हापूर उत्तरमधील महिलांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचार सभेत बोलत असताना हा प्रकार घडला असल्याचे चित्रा वाघ यांनी ट्विट करीत सांगितले आहे

Tags:    

Similar News