'त्या' घटनेवरून भाजप आमदार श्वेता महालेंची ठाकरे सरकावर टीका

Update: 2021-07-28 11:00 GMT

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या आमदार श्वेता महाले महाविकास आघाडीवर विविध मुद्यांवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. आता त्यांनी पुन्हा एका लाचखोर महिला अधिकाऱ्याला एक लाखांची लाच मागितल्याप्रकरणी, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचाराचे पाणी आता जिल्हा तालुका पातळीवर मुरताना दिसत असल्याचा खोचक टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एका जणाला लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. ज्यात एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. यावरूनच महाले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. श्वेता महाले यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "राज्यात सरकारच वसूली साठी अस्तित्वात आलंय म्हणल्यावर भ्रष्टाचाराचे पाणी जिल्हा तालुका पातळीवर मुरणारच....




   एका महिला अधिकाऱ्याला लाखो रुपयांची लाच मागीतील्या प्रकरणी अटक करण्यात आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती.  तर यावरून आता विरोधक सुद्धा सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे.
Tags:    

Similar News