मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

Update: 2021-07-23 05:58 GMT

परवा रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.लोकांच्या घरात पाणी शिरले असल्याने अनेकांना बचाव कार्यच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. कोकण विभागात याचा सर्वाधिक फटका बसला असल्याचा पाहायला मिळत आहे. मात्र असे असताना सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी घर सोडायला तयार नसल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?; असा खोचक टोला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करता म्हंटले आहे की, "राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?, खरी गरज आता आहे तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय," असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.



कोकणातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) ,रायगड (raigad) जिल्ह्यातील कर्जत व महाड भागाला अधिक फटका बसला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोरातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. मात्र प्रशासनाने वेगवान हालचाली करत लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

Tags:    

Similar News