रश्मी ठाकरेंवर भरत गोगावले यांचा मोठा आरोप । Bharat Gogawale on Rashmi Thackeray

Update: 2023-02-22 08:54 GMT

राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नाट्यमय घटना पाहायला मिळत आहेत. नुकतंच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. आता शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. खरंतर शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे अनेक आमदार पहिला गुजरात व त्यानंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर राज्यात असलेलं महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशा काही राजकीय घटना घडल्या की एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र येत मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. या सगळ्या घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. आणि त्यानंतर आतापर्यंत या सर्व घडामोडी घडल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडण्याचे सर्व आमदार एकमेव कारण सांगतात ते म्हणजे, उद्धव ठाकरे हे त्यांना वेळ देत नव्हते. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या अनेक आमदारांनी याबाबत आजपर्यंत बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी शिवसेना फुटीचे कारण सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.

भरत गोगावले यांनी नक्की काय म्हंटल आहे?

"काँग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल आम्ही जेव्हा-जेव्हा तक्रार करायचो तेव्हा उद्धव ठाकरे त्याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. आम्ही वारंवार आमची अडचण, कार्यकर्त्यांचे प्रश्न मतदारसंघातील समस्या घेऊन जात होतो पण त्यावेळी उद्धव साहेबांची थेरी आम्हाला वेगळी वाटली. मुख्यमंत्री पदाची खुर्ची, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहिले. उद्धव साहेबांच्या घरच्यांचा पक्ष संघटनेत हस्तक्षेप होऊ लागला होता. त्यांचे मेहुणे, भाचे आणि वहिनी कळत नकळत हस्तक्षेप करत होत्या असा आरोप एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी केला आहे...

Tags:    

Similar News