मुख्यमंत्री होणार नवरदेव, Bhagwant Mann यांच्या लग्नाला वऱ्हाडी कोण?

Update: 2022-07-06 15:32 GMT

पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान लग्न करणार आहेत.(Bhagwant Mann Marriage) भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना दोन मुलं असून ते त्यांच्या आई सोबत अमेरिकेत राहतात. त्यांनी पहिल्या पत्नीपासून फारकत घेतली आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इंद्रजीत आहे. दोघांनी २०१६ मध्ये फारकत घेतली होती.

कुठं होणार लग्न

चंदिगढ मध्ये खूप कमी लोकांच्या उपस्थितीत भगवान मान लग्न करणार आहेत.भगवंत मान ज्यांच्याशी लग्न करणार आहेत. त्यांचे नाव डॉ. गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या लग्नाला आपल्या परिवारासह हजर राहणार आहेत.

कोण आहेत डॉ. गुरप्रीत कौर?

भगवंत मान यांची होणारी पत्नी त्यांच्या नात्यातील असल्याचं बोललं जातंय. मान यांच्या आईशी तिची ओळख आहे. तसंच भगवंत मान यांच्या आईला देखील त्या पसंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून भगवंत मान आणि डॉ गुरप्रीत सिंह यांची एकमेकांशी ओळख आहे.

Tags:    

Similar News