रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला ; 'एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये - रुपाली चाकणकर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Update: 2021-12-28 03:09 GMT

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला ; रुपाली चाकणकरांकडून कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे. 'एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी' अशी मागणी चाकणकर यांनी ट्विट करत केली आहे.

Tags:    

Similar News