मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर घडला भयंकर प्रकार..

Update: 2022-07-05 10:08 GMT

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात आले ठाण्यात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे नॉटरिचेबल अशी एक बातमी आली आणि त्यानंतर आज पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय प्रसंग पाहण्यास मिळाले. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. हे सगळं करण्यासाठी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार पहिला मुंबईहून सुरतला तिथून थेट गुहाटीला गेले. इथेच हा प्रवास थांबला नाही तर गुवाहाटी वरून ते गोवाला आले आणि मग मुंबईत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मुंबईत येऊन देखील त्यांना ठाण्यात जात आलं नाही. तिथून ते पुन्हा गोव्याला गेले. आणि आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांसह पुन्हा मुंबईत आले. मुंबईतलं दोन दिवसाचं अधिवेशन संपलं. बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकार पास झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या ठाण्यात आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले.

हे सगळं होत असताना मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी पाणी सुद्धा तुंबले आहे. यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर एक मोठे झाड कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर रस्ते धुण्याचं काम सुरु होते. हे काम सुरू असतानाच अचानक हे मोठं झाड कोसळलं. हा अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठं नुकसान झाले आहे. जे झाड कोसळले ते थेट ठाणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवरच. हा प्रकार घडल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला.



Tags:    

Similar News