राणीबागेतील पेंग्विनच्या व बंगाली टायरच्या बछड्याचे बारसे अखेर संपन्न...

Update: 2022-01-18 08:35 GMT

मुंबईतील भायखळा भागात असणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आज नवीन जन्मलेल्या पेंग्विनच्या पिलाचे व एका बंगाली वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा पार पडला. त्यामध्ये पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ऑस्कर तर बंगाली टायगर च्या बछड्याचे नाव वीरा असे ठेवण्यात आले आहे.



मुंबईतील या राणीबागेतील उद्यानात पेंग्विन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. काही वर्षांपूर्वी परदेशातून हे पेंग्विन या बागेत आणले होते. त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात एका पिल्लाने जन्म घेतला होता. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी राणीबागेत बंगाल टायगरची एक जोडी आणली होती. या जोडीला नोव्हेंबर महिन्यात एक बछडा झाला होता. या दोन्ही नवजात पिल्लांचे आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत केक कापून नामकरण करण्यात आले.




 सध्या राणीबागेत पेंग्विन ची एकूण संख्या 9 इतकी झाली आहे. त्यामध्ये पाच नर आणि चार मादी आहे. तसेच दोन बंगाली टायगर देखील या राणीबागेत आहेत. यामध्ये एक नर (शक्ती) आणि एक मादी (करिष्मा) या वाघांच्या जोडीला आता बछडा झाल्याने बंगाली टायगरची संख्या आता 3 झाली आहे. सध्या कोणाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता पर्यटकांसाठी राणीबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




 


Tags:    

Similar News