पारंपरिक रांगोळीला स्मार्ट पर्याय "मॅट रांगोळीचा" नवा ट्रेंड

The new trend of "matte rangoli", a smart alternative to traditional rangoli

Update: 2025-09-28 14:22 GMT

दिवाळी जशी जवळ येत आहे, तशी घरसजावटीची तयारीही सुरू झाली आहे. या सजावटीमध्ये रांगोळीचं विशेष महत्त्व असतं. पारंपरिक रांगोळी रंगांपासून तयार केली जाते, पण ती सहज पुसली जाते आणि ती काढण्यासाठी वेळ आणि मेहनत दोन्ही लागतात. त्यामुळे यंदा एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय मॅट रांगोळीचा.

मॅट रांगोळी म्हणजे काय? तर मॅट प्रमाणे लोकरीच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या तयार केलेल्या डिझाईन्स... असे रांगोळी मॅट्स जे तुम्हाला फक्त तुमच्या घरासमोर, जिन्यावर किंवा दरवाज्याच्या उंबरठ्यावर ठेवायचे असतात. हे मॅट्स विविध आकर्षक रंगांमध्ये, आकारांमध्ये आणि डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपरिक शुभचिन्हे, फुलांच्या डिझाईन्स, पायघड्या यांचा समावेश असतो. या मॅट्स पुन्हा पुन्हा वापरता येतात, वॉश करता येतात आणि पुसले गेल्यामुळे खराब होत नाहीत. त्यामुळे रांगोळी कायमस्वरूपी सुंदर दिसते.

Delete Edit

या मॅट्सचा एक मोठा फायदा म्हणजे वेळ वाचतो. विशेषतः जेव्हा तुम्हाला जिन्यांवर, बाल्कनीत किंवा घराच्या इतर भागांत रांगोळी करायची असते तेव्हा पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढणे कठीण जाते. अशा वेळी छोट्या आकारातील मॅट्स वापरून सहज आणि सुंदर रांगोळी सजावट करता येते.

कोल्हापूरच्या संध्या इंगळे या कलाकार या प्रकारची मॅट रांगोळी डिझाईन करतात. त्या विविध रंगीबेरंगी आणि आकर्षक मॅट्स बनवून विक्री करतात. यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व मॅट्स वॉशेबल असतात, टिकाऊ असतात आणि अतिशय स्वस्त दरात उपलब्ध असतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत रांगोळी काढण्याचे टेन्शन नाही. तुम्ही सहजपणे ही मॅट्स खरेदी करू शकता आणि तुमच्या घराची सजावट अधिक आकर्षक करू शकता.

जर तुम्हाला अशी मॅट रांगोळी खरेदी करायची असेल तर संध्या इंगळे यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा मोबाइल क्रमांक आहे – 9172072552.

Tags:    

Similar News