#RussiaUkraineConflict ; रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार घसरले..

Update: 2022-02-24 07:54 GMT

आज रशिया-युक्रेन (Russai, Ukrain ) युद्धामुळे शेअर ( share market) बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पहिल्याच मिनिटात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 1,700 अंकांनी घसरून 55,563 वर पोहोचला आहे. बँकिंग समभागांना फटका बसत आहे. गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप रु. 248.18 लाख कोटी आहे, जे काल रु. 255 लाख कोटी होते.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे बाजार कोसळला

आहे, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगातील सर्व शेअर बाजार घसरले आहेत. आज सेन्सेक्स 1,814 अंकांनी घसरून 55,416 वर होता. त्याने पहिल्या तासात 55,984 ची वरची पातळी आणि 55,375 ची निम्न पातळी केली. त्याचे सर्व 30 शेअर्स घसरत आहेत. प्रमुख घसरलेल्या समभागांमध्ये टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एअरटेल, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक 3-3% पेक्षा जास्त घसरले.

टेक महिंद्रा, विप्रोहीचे शेअर्स ही घसरले

त्याचप्रमाणे टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, एचडीएफसी, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती, डॉ. रेड्डी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी 2 ते 3 % तुटलेली पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, कोटक बँक, टायटन, नेस्ले, सन फार्मा आणि एनटीपीसी यांचे समभाग प्रत्येकी 1 टक्क्यांपर्यंत घसरले.

सेन्सेक्सचे 76 शेअर्स अपर सर्किटमध्ये आणि 578 लोअर सर्किटमध्ये आहेत. याचा अर्थ असा की त्यांचे शेअर्स एका दिवसात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त कमी किंवा वाढू शकत नाहीत. सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध कंपन्यांपैकी 2,378 समभाग घसरत आहेत आणि 270 शेअर्स वाढले आहेत. 35 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 171 नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत.

Tags:    

Similar News