कॅलिग्राफीत सुध्दा 'पंकजा'चीच हवा...

Update: 2020-11-30 06:39 GMT

कॅलिग्राफी म्हणजेच उत्तम सुलेखन.. सध्या अशाच एका कॅलिग्राफीची चर्चा आहे ती म्हणजे 'पंकजा' या नावाची. प्रसिध्द कॅलिग्राफीस्ट सुनील धोपावकर यांनी पंकजा या नावाची सुंदर डिझाइन केली. सोशल मीडियात हे डिझाइन खुप व्हायरल झालं. शेवटी हे डिझाइन पंकजा मुंडे यांच्या पर्यंत पोहोचलं आणि त्यांनी ट्वीट करुन सुनील यांचे आभार मानले आहेत.

पंकजा मुंडेंनी वाढवला ABP माझा चा बाप

"कधी कुणाला दगा देणं ही गोपीनाथ मुंडेंची संस्कृती नाही" – पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये "सुनील धोपवकर सुप्रसिद्ध कॅलिग्राफीस्ट यांनी पंकजा नावाची सुंदर रचना केली आहे अर्थात ते माझं नाव आहे म्हणून माझ्याकडे आली..हा सर्व पंकजांचा सन्मान आहे असे मी समजते तर कोणी पंकजा असेल तर त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट करावा आणि'मी पंकजा' @DhopavkarSunil असे ट्विट करावे आणि मलाही टॅग करावे!" असं म्हटलं आहे.


आपल्या कलेची दखल पंकजा मुंडे यांनी घेतल्याचे कळल्यावर सुनील धोपावकर यांनी सुध्दा "पंकजा या नावाच्या असंख्य अक्षर फर्माईशी फेसबुक पेजवर आल्या म्हणून पंकजा नावाचा हा अक्षरबंध तयार केला, फेसबुक पेजवर झळकताच मा. पंकजाताई मुंडे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या स्वीय सहाय्यकांचा फोन आला. थोड्यावेळाने ताईंचा फोन आला. त्यांनी या अक्षर उपक्रमाचे कौतुक केले आणि मी पंकजा या नावाची ट्विटर वर मोहीमही घोषित केली ! मन:पूर्वक धन्यवाद पंकजाताई !" असं म्हणत त्यांचे आभार मानले आहेत.

एकनाथ खडसेंनंतर आता पंकजा मुंडे यांचं 'लो चली मैं'?

"कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं" - पंकजा मुंडे


Full View

Tags:    

Similar News