Home > Political > 'मी असं बोललेच नाही ABP माझा ने तात्काळ माफी मागावी' पंकजा मुंडे यांचं ट्वीट

'मी असं बोललेच नाही ABP माझा ने तात्काळ माफी मागावी' पंकजा मुंडे यांचं ट्वीट

मी असं बोललेच नाही ABP माझा ने तात्काळ माफी मागावी पंकजा मुंडे यांचं ट्वीट
X

'मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी नाही' अशा आशयाची बातमी ABP माझा या वृत्त वाहिनीकडून प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र हि बातमी खोटी असल्याचं पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन सांगीतलं आहे.

या ट्वीट मध्ये पंकजा यांनी "अशा प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही मी कधीही असे बोलत नाही. @abpmajhatv तात्काळ माफी मागावी आणि ही बातमी वापस घ्यावी. हे अत्यंत अयोग्य आहे व हे वारंवार होण्याबद्दल मला खंत वाटते." असं म्हटलं आहे.

https://twitter.com/Pankajamunde/status/1331992911559360519

दरम्यान, आता ABP माझाचे राहूल कुलकर्णी यांनी यावर अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी "झालेला प्रकार हा आमच्या हिंगोली प्रतिनिधींनी दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे झाला. ती आमची जबाबदारी आहे. त्या बद्दल दिलगीर आहोत. झालेल्या चुकी बद्दल योग्य ती कारवाई करण्यात आली आहे." असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RahulAsks/status/1332175997471494150

Updated : 27 Nov 2020 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top