Latest News
Home > Political > "कधी कुणाला दगा देणं ही गोपीनाथ मुंडेंची संस्कृती नाही" – पंकजा मुंडे

"कधी कुणाला दगा देणं ही गोपीनाथ मुंडेंची संस्कृती नाही" – पंकजा मुंडे

विधानसभा निवडणूकी नंतर दुरावलेले पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांत एकाच मंचावर दिसत असले तरी पंकजा मुंडे यांची नाराजी अजून दुर झालेली नाही हे या वरुन दिसुन येतं.

कधी कुणाला दगा देणं ही गोपीनाथ मुंडेंची संस्कृती नाही – पंकजा मुंडे
X

पंकजा मुंडे या स्वपक्षावर नाराज असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. अनेकवेळा त्यांनी आपल्या भाषणात सरकार सोबतच स्वपक्षावरही नाव न घेता टीका केली. त्यामुळेच पंकजा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत असतो. याच पार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाची शेलक्या शब्दात कान उघडणी केली.

पंकजा मुंडेंनी वाढवला ABP माझा चा BP

परभणीतल पदवीधर उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, "भले ही आमच्यावर अन्याय झाला असेल, भले ही आम्हाला त्रास झाला असेल, भलेही आम्हाला जीवनात कठीण वाटलं असेल मात्र, पाठीत खंजीर खुपसणारं रक्त गोपीनाथ मुंडेंच नाही. पोटात एक ओठात एक ही आमची संस्कृती नाही." असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंनंतर आता पंकजा मुंडे यांचं 'लो चली मैं'?

दरम्यान, विधानसभा निवडणूकी नंतर दुरावलेले पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांत एकाच मंचावर दिसत असले तरी पंकजा मुंडे यांची नाराजी अजून दुर झालेली नाही हे या वरुन दिसुन येतं.

"कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं" - पंकजा मुंडे


Updated : 2020-11-29T13:04:22+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top