'मजहब नही सिखाता' आपस मे बैर रखना'- ज्वाला गुट्टा

Update: 2020-04-19 00:10 GMT

कोरोनाच्या व्हायरस पेक्षा देशात जातीय तेढ निर्माण करणारे संदेश अधिक जोमाने पसरत आहेत. कोरोनाच्या संकटापेक्षा धार्मिक द्वेषाचं संकट मोठं आहे. अशा बिकट परिस्थितीत देशाला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिने भारतीय समृद्धी आणि एकात्मतेचं प्रतीक असलेल्या गीतामधील काही ओळी लिहत एकतेचा संदेश दिला आहे.

हे ही वाचा

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींकडून द्वेष पसरवणारी वक्तव्य केली जात आहेत. नुकतंच भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट हिचं मुस्लिम समाजविरोधी ट्विटही फारच चर्चेत आलं आहे.

ज्वालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देशासाठी एकतेचा संदेश देताना म्हटलंय की,

मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना हिन्दी है हम वतन है, हिन्दोसतां हमारा!!!

अर्थात, नेटकऱ्यांनी ज्वालाच्या या ट्विटला आणि गीताला न चुकता विरोध केलाच आहे.

Similar News