एक दिवस शाळा नाही पण कला पाहाल तर अवाक व्हाल..

Update: 2023-03-18 02:53 GMT

सुईत ओवलेल्या रंगीत धाग्याने कापडावर मुक्ताबाई पवार टाके घालू लागतात. समोरील कापडावर त्यांचा हात जसजसा फिरू लागतो, तसतसे सुंदर नक्षीने ते कापड सजू लागते. कांचळी, लेहंगा आणि घुंगटला सौंदर्य प्राप्त होत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणार्या रामदास तांडा येथील मुक्ताबाई पवार यांनी बंजारा कलेचा हा समृद्ध वारसा आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. आज वयाच्या सत्तरीतही न चुकता त्या आठ ते दहा तास भरत काम करतात. त्यांना हा वारसा त्यांच्या आईपासून मिळालाय. आई कांचळी, लेहंगा आणि घुमटावर हाताने भरत काम करायची. आईचे काम पाहून त्यांना आवड निर्माण झाली. सुरुवातीला घरात पडलेल्या चिंधीवर देखील त्यांनी काम केलं आहे.

मुक्ताबाई जवळपास आज पन्नास जर पन्नास वर्षांपासून बंजारा हस्तकलेचं काम त्या करत आहे. शाळेची पायरीही न चढलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या कलेतून पर्यावरण संवर्धन, स्त्री भ्रूण हत्या, जागतिक तापमान वाढ, वृक्षारोपण या संदर्भात सामाजिक संदेश देणार्या अनेक कलाकृती, कपड्यांवर साकारल्या आहेत. त्यांनी आजवर सावित्रीबाई फुले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी, किरण बेदी, सोनिया गांधी, अरुणा असफ अली यांच्यासह अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचं चित्र आपल्या कलेतून साकारली आहेत. त्यांनी साकारलेल्या या कलेमुळे त्यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या आजीची कला पाहून तुम्ही देखील आवक व्हाल..

Full View

Tags:    

Similar News