Home > रिपोर्ट > पुरुषांनो सावधान! बायकोला माराल तर व्हाल संस्थात्मक क्वारंटाईन

पुरुषांनो सावधान! बायकोला माराल तर व्हाल संस्थात्मक क्वारंटाईन

पुरुषांनो सावधान! बायकोला माराल तर व्हाल संस्थात्मक क्वारंटाईन
X

कोरोना लॉकडाऊन (Lockdown) च्या काळात पुण्यात घरगुती भांडणाच्या तक्रारी येऊ लागल्या आहे. पुणे जिल्हा परिषदेने वाढत्या महिला अत्याचाराविरोधात नवीन कल्पना लढवली आहे. लॉकडाऊनच्या काळात पत्नीचा छळ कराल तर संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional Quarantine) मध्ये पाठवलं जाणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळाला संधी समजून घरातील महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना आता स्वत:वर ताबा ठेवण्याची गरज आहे.

हे ही वाचा...

लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहून लोकांची चिडचिड वाढली आहे. अशात पती पत्नीमधील घरगुती भांडणांची प्रकरणही वाढत आहेत. यावर तोडगा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने गाव पातळीवर महिला दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे. याच अंगणावाडी सेविका, महिला बचतगटातील पदाधिकारी आणि ग्रामपंचायत महिला सदस्य असून ज्येष्ठ महिलांचाही समावेश केला जाईल. या समित्य़ा कुटुंबातील वादादीत प्रकरणावर समुपदेशन करणार आहेत. तरीही अत्याचाराच्या घटना कायम राहिल्यास पोलिसांच्या मदतीने थेट त्या पुरुषांना संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये पाठवलं जाणार आहे.

Updated : 18 April 2020 10:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top