Home > रिपोर्ट > ठाणे-पालघरमध्ये ते पेटवत आहेत गोरगरीबांची चुल

ठाणे-पालघरमध्ये ते पेटवत आहेत गोरगरीबांची चुल

ठाणे-पालघरमध्ये ते पेटवत आहेत गोरगरीबांची चुल
X

जो माणूस आपल्या सुखाचा- समृद्धीचा, कुटुंबाचा - नात्यागोत्यांचा विचार न करता सदैव गोरगरीबांच्या कल्याणाचा, त्यांच्या सुख- दुःखाचा, अडी - अडचणींचा विचार करतो तो देवदूतच असतो... आज अवघे जग लॉकडाऊनमध्ये अडकले असताना गेली 20 - 25 दिवस ते गोरगरीबांच्या घरची चूल विझू नये म्हणून राबत आहे... प्रत्येकाने स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात बंदिस्त करून ठेवले असताना ते मात्र गोरगरीबांच्या घरात डोकावून काही कमी पडत तर नाही ना याची काळजी घेत आहे....

होय..!! ते आहेत "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे" संस्थापक आणि पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश भगवान सांबरे..!! ठाणे -पालघर जिल्ह्यावर, कोकणावर वा महाराष्ट्रावर कुठलेही संकट असो... हा माणूस मदत कार्यासाठी सदैव पुढेच असतो..!! मग तो सांगली- कोल्हापुरचा महापूर असो वा कोकणातील महापूर असो...!!!

कुठलाही गाजावाजा न करता सांगली - कोल्हापुरच्या महापुरात तब्बल 2 लाख वह्या आणि 20 हजार ब्लेंकेट्सचे वाटप करण्यात आले. 40 जणांची टीम पूर्ण 15 दिवस या "ज्ञान आणि दानयज्ञासाठी" अखंड राबत होती. मदत पोहोचवण्यासाठी या टीमने संपूर्ण सांगली - कोल्हापुर पिंजून काढले... नजरचुकीने चुकूनच एखादी शाळा शिल्लक राहिली असेल मदतीवाचून ... कुठलेही शासकीय पद वा मदत नसतानाही त्यांच्या आदेशाने इतके मोठे काम जिजाऊ संस्थेने केले होते या नैसर्गिक आपत्तीमध्ये...!!

आजही अवघा महाराष्ट्र आणि देश संकटात असतानाही निलेश सांबरे पायाला भिंगरी लावून उभे आहेत. अवघ्या ठाणे - पालघर जिल्ह्यात कोणीही उपाशी झोपू नये म्हणून काळजी घेत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्व आदिवासी पाड्यांमध्ये मदतीचा ओघ सुरु आहे. जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दि. 17 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असताना कुठलाही कौटुंबिक कार्यक्रमही न करता आलेल्या संकटाचा विचार करून तब्बल 25,000 कुटुंबियांना पुढील 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्य वाटप सुरु आहे. या किटमध्ये 5 किलो तांदूळ, 2-2 किलो कांदे - बटाटे, तेल, डाळी, मसाले, मीठ यांचा समावेश आहे. ठाणे - पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत ही मदत पोहोचवली जात आहे. अतिशय शांतपणे हा मदतीचा आणि अन्नाचा महायज्ञ सुरु आहे.

निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे"च्या माध्यमातून कोकणात शेकडो उपक्रम सुरु आहेत. पालघर जिल्ह्यात झड़पोली येथे 50 खाटांचे मोफत हॉस्पिटल 24 तास सुरु आहे. पालघर जिल्ह्यातील गोरगरीबांवर येथे मोफत उपचार होत आहेत. जानेवारी महिन्यात देशाचे नेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते गोरगरीबांसाठी 200 खाटांच्या मोफत कैंसर हॉस्पिटल आणि आतरराष्ट्रीय दर्जाच्या मोफत शिक्षण संकुलाचे भूमिपूजन पार पडले. लवकरच ते जनसामान्यांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. आतापर्यंत ठाणे - पालघर जिल्ह्यात व कोकणात 250 च्या वर आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून 2 लाख रुग्णाची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले आहेत. तर हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत व हजारों रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. तसेच ठाणे - पालघर जिल्ह्यासाठी व कोकणासाठी 7 रूग्णवाहिका देण्यात आल्या असून यात 3 कार्डियाक एम्बुलेंसचा समावेश आहे. यातील 5 एम्बुलेंस ठाणे - पालघर जिल्ह्यात जीवनवाहिनीचे काम करतात तर 2 कार्डियाक अम्बुलेंस कोकणासाठी काम करत आहेत. कुपोषण व कैंसरमुक्तिसाठी 70 च्या वर शिबिरे घेण्यात आली असून 200 च्या वर महिलांना कैंसर प्रतिबंधक लस पुरवण्यात आली आहे. तर एक रुग्णवाहिका रोज कैंसर पेशंट टाटा आणि कामा हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम करते. कोकणातील शेकडो गोरगरीब रुग्णांना ऑपरेशनसाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे तसेच ठाणे व मुंबईतील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांची मोफत ऑपेरशन करण्यात येत आहेत.

"जिजाऊ शिक्षण अभियाना"च्या माध्यमातून गोरगरीबांच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे याचा विचार करून निलेश सांबरे यांनी आपल्या आईच्या नावाने विक्रमगड येथे सौ. भावनादेवी भगवान सांबरे सीबीएसई स्कुल आणि कॉलेज समर्पित भावनेने सुरू केले असून JEE व NEET परिक्षांची तयारी तज्ञ प्राध्यापक वर्गामार्फत करून घेतली जाते.

तर जव्हारमध्ये चालतवाड, मोखाडयामध्ये ब्राम्हणपाडा व खोडाळा तसेच वाडयामधील उज्जैनी या आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकरीता पाच नवीन CBSE शाळांची उभारणी करण्यात आली आहे. सध्य स्थितीत येथे शेतकरी व शेतमजूरांची 2000 च्यावर मुले मोफत इंग्रजी शिक्षण घेत आहेत.

ओमकार अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा सुरु करून १०० दिव्यांग मुले दत्तक घेतली आहोत. त्यांना हस्तकला प्रशिक्षण, कॅप्युटर प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, सांगित प्रशिक्षण, क्रिकेट टीम यांसारखे उपक्रम राबवुन त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचा संस्थेचा मानस आहे. यातील 4 मतिमंद विद्यार्थी जळगाव येथे UPSC ची तयारी करण्यासाठी पाठवण्यात आले असून येथील दीपस्तंभ अकादमीत महाराष्ट्रातील 11 विद्यार्थ्यांचा खर्च जिजाऊ संस्था करत आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांकडे अफाट गुणवत्ता, जिद्द, चिकाटी व मेहनत असून देखील MPSC/UPSC सारख्या स्पर्धा परिक्षांसाठी माहितीअभावी व मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी पोहोचू शकत नाही ही दुर्देवी बाब आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून झडपोली येथे सुसज्ज ओमकार स्पर्धा परिक्षा ॲकडमीची स्थापना करण्यात आली असून स्पर्धा परिक्षांसाठी लागणारे मार्गदर्शन, मानसिक कणखरता, पुस्तके, अभ्यासासाठी लागणारे पोषक वातावरण या सुविधा कठोर मेहनतीची तयारी असणाऱ्या निवडक १०० विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जात आहेत. तर संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे 30 विद्यार्थी UPSC ची तयारी करत आहेत. तसेच कोकणासाठी 33 च्या वर मोफत वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. तसेच संस्थेकड़ून मोफत पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि सैन्य प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येते. यामाध्यमातून शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत, पोलिस व सैन्यदलात दाखल झाले आहेत.

कोकणात विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 10 लाखाच्या वर मोफत वह्यांचे वाटप करण्यात येते. तसेच मिशन अकादमीच्या माद्यमातून 10 वी पर्यंत गोरगरीबांच्या मुलांसाठी मोफत कोचिंग क्लासेस चालवले जातात. तसेच विद्यार्थी दत्तक योजना राबवून दरवर्षी किमान १०० मुलांच्या उच्चशिक्षणासाठी संस्थेकडून आर्थिक मदत व उत्तम महाविदयालयीन प्रवेशासाठी प्रयत्न केले जातात. वाडा येथे जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी व तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येते तसेच त्यांना उद्योगासाठी व नोकरीसाठीही मदत केली जाते.

"जिजाऊ महिला सक्षमीकरण विभागा"च्या माद्यमातून व सौ. मोनिकाताई पानवे यांच्या संकल्पनेतून ठाणे पालघर जिल्हयातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण व सबलीकरण यांवर विविध अभियान राबवले जात आहेत.

यात सुमारे १९ प्रकारे स्वंयरोजगारासाठी कार्य सुरू असून महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी जिजाऊ संस्था विविध स्वयंरोजगार, व्यवसायासाठी प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करुन देत आहे. या विभागांतर्गत आतापर्यंत ३० हजार महिलांना भेट देऊन १० हजार महिलांना प्रशिक्षण देऊन, ५००० महिलांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

"जिजाऊ क्रीडा अभियाना"च्या माध्यामातून ग्रामीण भागातील शेकडो मुलांना कबड्डी, कुस्ती, खो-खो, ॲथलेटिक्स व मॅरेथॉन खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून गेली 5 वर्षे कोकण वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. कोकणातील सर्वात मोठी ही स्पर्धा असते आणि तब्बल 10 हजारच्या वर स्पर्धक यात सहभागी होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न केले जात असून अनेक

खेळाडूंना राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. झडपोली येथे संस्थेचे सुसज्ज असे मैदान व कबड्डीसाठी राष्ट्रीय स्तरावरील मॅट विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे.

जिजाऊ कृषी विकास अभियानाच्या माध्यमातून पालघर व ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेच्या व इस्कॉनच्या संयुक्त माध्यामातून मोफत सेंद्रिय कृषी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. केवळ उत्पादनवाढीसाठी भर देत सेंद्रिय मातीचा कस टिकवण्याचे प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी दत्तक योजना राबविण्यात येऊन मोफत रोपे व खत वाटप करण्यात आले. आतापर्यंत संस्थेकडून 5000 शेतकऱ्यांना दत्तक घेतले आहे. निसर्ग संवर्धन व शेतकरी सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी १ लाख उत्तम दर्जाच्या झाडांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. यात आंबा, काजू, शेवगा, जांभूळ, चिंच या फळझाडांचा समावेश आहे. जिजाऊ महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला व शेतकऱ्यांना फुलशेती, फळशेती, भाजीपाला लागवड यांसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून ४२ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या गोष्टी लक्षात घेऊन जिजाऊ संस्थेकडून आतापर्यंत २०० च्यावर बोअरवेल मारण्यात आलेल्या आहेत.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेली निस्वार्थ कार्याची यादी न संपणारी आहे. कुठलीही शासकीय मदत न घेता ते करत असलेले कार्य खरेच अद्वितीय असेच आहे.… समाजाप्रति आणि देशाप्रति श्रद्धा असणारी माणसेच अशी निस्वार्थ कार्य करू शकतात...अशा या ऊर्जेचा अखंड झरा असणाऱ्या निलेश सांबरे यांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ...

Updated : 18 April 2020 12:11 PM GMT
Next Story
Share it
Top