पुरुष बिल्डर देखील फिक्के पडतील अशा बॉडी बिल़्डर - "किरण देंबला"

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य शक्य होऊ शकतं हे सिद्ध केलंय हैदराबाद किरण देंबला यांनी.... Flattening the Stereotype! Sneak peek into the Woman Bodybuilding champ inside pictures. Motivational!!

Update: 2020-11-21 15:37 GMT

हैदराबादच्या असलेल्या किरण देंबला या लग्नानंतर दहा वर्षे रोजचं तेच घरकाम आणि मुलं बाळं यातच गढून गेल्या होत्या. चार भिंतीच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचं त्यांनी ठरवलं आणि सुरुवातीला मुलांचे गायनाचे क्लास घ्यायला सुरुवात केली. पण त्याचवेळी तब्येत बिघडली होती आणि वजनही वाढलं होतं. वजन कमी करण्यासाठी जीम जॉइन केली. जीममध्ये जायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 7 महिन्यात 24 किलो वजन कमी केलं.


जिममध्ये वर्कआउट करत असताना कुटुंबातील जबाबदाऱ्यासुद्धा किरण यांनी समर्थपणे सांभाळल्या. दरम्यान, त्यांनी आपल्याला जीम उघडायची असल्याचं पतीला सांगितलं. पतीनेसुद्धा त्यांच्या या नव्या कामाला प्रोत्साहन दिलं. जीमसाठी जागेची अडचण होती आणि त्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला. जीमचं साहित्य आणण्यासाठी दागिने विकले आणि कर्ज घेतलं. चारच महिन्यात जीमचं नाव आजुबाजुच्या परिसरात झालं.

त्यांनी भारतातर्फे बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला होता व त्यात सहावा क्रमांक देखील पटकावला होता.

सुरुवातील फक्त वजन कमी करण्यासाठी जीम सुरू केलेल्या किरण यांनी शरिरसौष्ठव स्पर्धांची तयारी केली. त्यांनी बुडापेस्टमधील स्पर्धेत भाग घेतला आणि सहावा क्रमांक पटकावला. आज वयाच्या 45 व्या वर्षी त्या ट्रेनर म्हणून काम करत आहेत. डीजे, गिर्यारोहक आणि फोटोग्राफर अशी त्यांची ओळख आहे. किरण देंबला म्हणतात की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे आणि लोकांना एकच सांगेन की तेच करा ज्यातून आनंद मिळतो.

Tags:    

Similar News