ब्लाऊजच नको गडे...
No blouse? blog on Navratri | ब्लाऊजच नको गडे... | MaxWoman
ते ब्लाऊज नावाचं वस्त्र आता कालबाह्यच झालंय म्हणायचं का? नाही म्हणजे उर्ध्व भाग ब्लाउज फॅशनच्या नावाने सरसकट उघडाच ठेवायचा अस ठरलंय बहुदा मराठी आणि मालिका मनोरंजन विश्वात... कसली आलीय समानता ?? हॉलिवूड ची कॉपी बॉलिवूड करणार... आणि त्या बायांची कॉपी मराठी विश्व करणार... आता सगळीकडे नवरात्र सुरू आहे... आदिशक्ती... आदिमायेचा जागर सर्वत्र सुरू आहे... पण त्याउलट... स्वतःची आत्मिक शक्ती डावलत... हे असले उथळ अंग प्रदर्शन सुरू आहे... मालिका... चित्रपट... अगदी रोजच्या जीवनातही... अधिकाधिक कपडे छोटे होत आहेत... वस्त्र पारदर्शक होत आहेत...आणि अगदी फक्त टोकाचं बोलायचं तर केवळ निपल्स झाकत, पाठ नी छाती उघडे टाकणारे ब्लाऊज घालणं सुरू आहे... विशेषतः हिंदी चित्रपट सृष्टीत हे अधिक पहायला मिळतंय. पदर असतो...
पण तो अर्धा ब्लाऊज कव्हर करतो... दुपट्टा घ्यायचा पण त्याचा फास गळ्याला आवळून वा...खांद्यावर टाकून... गळा ओसंडलेलाच ठेवायचा ... म्हणजे काय ? सध्या बरेच फेस्टिव्हल्स टीव्ही जगतात सुरू आहेत... तिथेही... राबता वेस्टर्न गाऊन चा... ५००० वर्ष जुनी हिंदू संस्कृती नीट वागवायची की काल परवा उदयाला आलेली संस्कृती मिरवायची... याचं भान सुटत चाललं आहे... स्त्री काय पुरुष काय अवयव प्रत्येकाला आहेत... नग्न अवस्थेतून शोध लावत लावत माणसाने वस्त्रांची दुनिया शोधली. वस्त्रांनी माणसाला सौंदर्य बहाल केले... मात्र भरकटलेल्या लोकांना पुन्हा एकदा आदिमानवाचे नग्न राहणे आवडू लागले आहे की काय असा प्रश्न पडतो आहे... विशेषतः स्त्रियांना... सुटत चाललं आहे भान एका सभ्य समाजात नीट वस्त्र वापरण्याचं...
हे असं अंग प्रदर्शन, स्वातंत्र्याच्या आड लपवू पाहत आहेत काहीजणी... मला प्रश्न पडतो...पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला उत्तान कपडे घालून खुणावते ती वेश्या ... तिला वाईट का म्हणायचं मग. चीड आणणार आहे सगळं. अपवाद आहेत पण फारच कमी.
त्या आदी शक्तीलाच साकड घालावंसं वाटतं आहे, या बायांना सुबुद्धी दे... सुबुद्धी दे अंगभर वस्त्र नेसण्याची... मला माझ्या बुद्धिमत्तेने काम मिळाव...माझं शरीर दाखवून व्वा पाहून नाही..
– तृप्ती राणे
#ब्लाऊज #fashion #हिंदूसंस्कृती #संस्कृती #मराठीमनोरंजनक्षेत्र #मराठीमालिका #अभिनेत्री
टीप – उगाचच स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली या पोस्टखाली कुणी वाद घालायला येऊ नये... तुमच्यासाठी ही पोस्ट नाही... ज्यांना विचार करायची ईच्छा आहे...त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे... कुणालाही दुखावण्याचा हेतू नसतो... पण या गोष्टीसाठी हरकत नाही... बघवत नाहीय हे उघड नागडं रूप... फार अतिरेक होतोय.. म्हणून हा लेख प्रपंच...