मुलगी का नको?

Update: 2020-10-09 05:37 GMT

मुलगी का नको असे विचारल्यावर बायका जे उत्तर देतात, ते ऐकून हृदयाला पीळ पडतो. त्या म्हणतात, आम्ही भोगलं ते भोगलं आयुष्यभर,पोटच्या गोळ्याला ही ते भोगायला लागताना बघणं सहन होणार नाही आता…

त्यांच्या डोळ्यात नैराश्य असतं, त्यांना वेगानं बदलत्या जगाबरोबर मुलींना दिली जाणारी वागणूकही बदलेल अशी अजिबातच आशा नसते. उमेद जळालेली त्यांची मनं परत तेच ते अपमान गिळण्याचे प्रसंग आता सहन करण्यास तयार नसतात.

मुलींना जन्म द्या,त्या आपल्या पायावर उभं राहतील, धाडसानं पुढं येतील, समाज त्यांना समानतेची वागणूक देईल अशी भाषणं त्यांना ऐकवताना माझीही जीभ जड येऊ लागलीय आताशा.. बायकांचं जगणं इतकं केविलवाणं का करून टाकलं व्यवस्थेने? फक्त पेशींमध्ये एक्सच्याऐवजी वाय गुणसूत्र आहे म्हणून इतकी मुजोरी?

कधीतरी चमकतील का डोळे बायकांचे 'मुलगी' झालीय म्हणून सांगीतल्यावर? आपल्या उत्क्रांतीमध्येच झालेल्या,घडवून आणल्या गेलेल्या ह्या पुरुषसत्ताकतेच्या बिघाडाला आता कोणती जीन थेरपी सुधारेल?


Tags:    

Similar News