"मसाला क्वीन" कमलताई परदेशी

कोण आहेत ‘मसाला क्वीन’ कमलताई परदेशी अचानक चर्चेत येण्याचं कारण काय? हजारो महिलांना कसा दिला रोजगार वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख

Update: 2021-08-25 06:30 GMT

"मसाला क्वीन" कमलताई परदेशी दुर्दैवाने भारतातील कॉर्पोरेट / वित्त भांडवल तुम्हाला "देशी" नाही "परदेशी" म्हणूनच वागवणार कमलताई परदेशी, शेतमजूरी केलेल्या, स्वयंसहायता गटाच्या चळवळीचे पाणी लागले. आपल्या सारख्या इतर गरीब, औपचारिक शिक्षण नाकारल्या गेलेल्या महिलांना हाताशी घेऊन "मसाले" बनवून विकायला सुरुवात केली.

नाबार्ड वगैरेंच्या साहाय्याने एका मसाल्यापासून सुरुवात करून ४० विविध प्रकारचे मसाले करत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार; अंबिका मसाला ब्रँड निर्यात होऊ लागला. नोटाबंदी, कोरोना याने धंद्याची वाताहत झाली. मात्र, अजून जिद्द संपलेली नाही. आम्हाला सबसिडी नको, आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला कर्ज परतफेडीची मुदत वाढवून द्या. असं त्या म्हणतात एबीपी माझा च्या कट्यावर मुलाखतीत त्या बोलत होत्या.

गरिबांच्या सब्सिडीवर, कर्जमाफीवर जहरी टीका करणारे कॉर्पोरेट धार्जिणे मध्यमवर्गीय व्यक्तींना आवाहन

अशा लाखो उद्योजक महिला, अंगीभूत उद्योजकतेच्या जोरावर, एकट्याला नाही आपल्या सारख्या इतर गरीब महिलांना दारिद्र्यातून बाहेर काढण्याची ईर्षा बाळगून काम करत आहेत. अक्षरशः लाखो स्त्री पुरुषांची उद्योजकता कोमेजून मरून गेली आहे. गेल्या ४० वर्षात

आदर सत्कार, दोन चार बक्षिसे, मुलाखती, टोकन मदत त्यांना केली जाणार आहे. पण रोजगार प्रधानतेचे, दारिद्र्य निर्मूलनाचे हे विकेंद्रित मॉडेल रुजू दिले जाणार नाही. फारसे फोफावू दिले जाणार नाही. त्याला फक्त शोकेस मध्ये ठेवले जाईल.

कारण ते कॉर्पोरेट केंद्री, वित्त भांडवलाने स्पॉन्सर केलेल्या स्टार्ट अप्स मॉडेलला छेद देते.

कमलताई परदेशी म्हणजे झोमॅटोचा प्रमोटर दीपेंद्र गोयल नाही, फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल नाहीत. ना पेटीएम चे विजयशेखर शर्मा नाहीत. म्हणून परकीय जाऊ द्या. देशी प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल देखील तुमचे मॉडेल सपोर्ट करणार नाही; फक्त बक्षिसे देतील. गरिबांना सांगत राहतील की बघा त्या कमलताई, तुम्ही पण चिकाटी, हुशारी दाखवलीत तर उद्योजक होऊ शकाल; पण आमच्या सिस्टिमकडून काही अपेक्षा बाळगू नका.

संजीव चांदोरकर (२२ ऑगस्ट २०२१)

Tags:    

Similar News