नवरा गेला पण वृत्तपत्र बंद पडू दिलं नाही ,स्वतः झाली संपादिका ...

Update: 2023-01-11 06:53 GMT

देश स्वातंत्र्य असताना अनेक क्रांती घडल्या.महाराष्ट्रात सुद्धा अन्याय अत्याचारांवर बंड पुकारले गेले आणि आपल्या लेखणीच्या ताकदीने बदल घडवण्याचे काम समाजसुधारक करत असताना ...एक महिला संपादक होऊन गेली.आपल्या पतीच्या निधनानंतर आज आमदार होताना अनेक महिला आमदार आपल्यला दिसतात ...पण त्या काळात शिकलेल्या महिला कमीच ... तरीही आपल्या पतीच्या निधनानंतर दीनबंधू या वृत्तपत्राच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तानूबाई बिर्जे ... इतिहास रचून गेल्या ... आज त्यांच्याविषयीच मी बोलते ...

महात्मा ज्योतिराव फुले यांचे जवळचे सहकारी असलेल्या कृष्णराव भालेकर यांनी बहुजन समाजाचे प्रबोधन व्हावे या हेतूने सत्यशोधक चळवळीच्या प्रभावाखाली येऊन पुणे येथे दि. १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले.पुढील चार वर्षात १५० वर्ष पूर्ण होतील ... नवीन सरकारी कायदे कानुन , दुष्काळाची आपत्ती आणि अनेक कारणांनी शेतकरी कर्जबाजारी झाला होता ... सावकारकीमुळे अनेक शेतकर्यांच्या जमिनी हातच्या गेल्या . उठाव आणि आंदोलन हेच पर्याय शेतकर्त्यांकडे होते ... महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांनि उठाव केले.याच दिन दुबळ्यांचे आवाज उठवणारे वृत्तपत्र दीनबंधू ठरले .

तानुबाई बिर्जे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या. तानुबाईं बिर्जे यांचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुले यांच्या शाळेत झालं. तानुबाई यांचे वडिल देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. त्यामुळे सावित्रबाई आणि महात्मा फुले यांच्या सहवासात तानुबाईंचे जीवन गेल्यामुळे त्यांचा सत्यशोधक चळवळीचे विचार त्यांच्याकडे होते. २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

दीनबंधु या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि १९०६ सालापर्यंत त्यांनी वृत्तपत्र चालवलं. मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्यामुळे दीनबंधु वृत्तपत्र बंद पडतेय की काय असा प्रश्न पडू लागला होता, मात्र तानुबाई यांनी न डगमगता प्रबोधनाचे कार्य आणि दीनबंधु वृत्तपत्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी 'दिनबंधु' चालवायला घेतले. ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तानुबाईंनी संपादक म्हणून त्यांनी आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करुन त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यामातून प्रबोधन करण्याचे ध्येय तानुबाई यांचे होते.

तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला पत्रकार ज्यांनी सत्यशोधक पद्धतीने पत्रकारिता करत समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडवला.आणि इतिहास रचला ...हाच इतिहास आज आपल्या सर्वानाच प्रेरणा देतो ...

Tags:    

Similar News