नवरात्रीपर्यंत वजन कमी करायचं आहे ,मग हे जरूर करा .

Update: 2022-09-10 08:10 GMT

नवरात्रीत दांडियासाठी दरवर्षी नवीन प्लॅन तुम्ही करत असाल.कोणता ड्रेस घालायचा ,कोणती ज्वेलरी घालायची पण वजनाच काय? घागरा घालायचा असेल चनिया चोली घालायची असेल तर मी त्या ड्रेसमध्ये व्यवस्थित दिसेन का ? हा प्रश्न सगळ्या मुलींच्या तसेच महिलांच्या मनात येतो. मग नवरात्रीपर्यंत कसं वजन कमी करता येईल याचा जर विचार करत असाल तर हा लेख नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी काय करावं

1)स्वतःच्या लठ्ठपणावर नाराज होणं टाळा

आपलं वजन वाढल्याने हवी तसं राहणीमान जगता येत नाही .म्हणून त्रस्त असणाऱ्या अनेक महिला फक्त स्वतःला दोष देत बसतात.पण तुम्ही जश्या आहात तसं आधी स्वीकारायला सुरुवात करा.विचित्र वाटतंय? जर आपण आपला लठ्ठपणा स्वीकारला तर वजन कमी कशाला करायचं? याच उत्तर असं आहे की ,स्वतःला स्वीकारलं की मन शांत होतं आणि चिंता थांबते.त्यामुळे अशा मनस्थितीत वजन कमी करण्याकडे अजून लक्ष देता येते.परिणाम सकारात्मक दिसायला लागतो .

2)लवकर उठून व्यायाम करणे

सकाळी लवकर उठणं प्रत्येकाला जमत नाही.पण सदृढ शरीरासाठी लवकर उठून व्यायाम करणं गरजेचं आहे.त्यामुळे दिवसभरात ताजेतवाने राहण्यास मदत होते.ठरलेली कामे पटापट होतात.व्यायामाने वजन कमी होण्यास बरीच मदत होते.

3)भरपूर पाण्याचे सेवन करा

महिला घरची कामे तसेच अनेक महिला ऑफिसला पण जातात.कामच्या घाईत पाणी पिण्याचं प्रमाण मंदावते.त्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्याचा पुरवठा होत नाही.पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

3)चटकदार खाणे टाळा

सणासुदीला घरात फराळाचे गोडधोड पदार्थ बनतात.तसेच तळलेले ,चटकदार पदार्थ आपण आवडीने खातो .पण या पदार्थांमुळे पुन्हा वजन वाढण्यास मदत होते .

4)संकल्प दृढ बनवा

या सगळ्या गोष्टी बऱ्याच महिलांना माहीत असतात पण कृती होत नाही.त्यामुळे जर वजन कमी करायचं असेल तर संकल्प दृढ असणं गरजेचं आहे.जर तुम्ही एकदा वजन कमी करायचं ठरवलं तर त्यावरून मागे हटायचे नाही.

या सर्व सवयी तुम्ही पाळल्या तर नक्कीच नवरात्रीपर्यंत स्वतःमध्ये तुम्हाला बदल जाणवेल.

Tags:    

Similar News