हेरंब कुलकर्णी यांची पोस्ट; ही आमची एकल महिला...

''सर मी मोनिका शिंदे, राहणार केडगाव, अहमद नगर.माझी चार महिन्यापूर्वीच अनुकंपा मधून नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झाल्यापासून मी 3-4 वेळा बालसंगोपन ऑफिसला कॉन्टॅक्ट केला पण माझा फोन उचलला नाही आणि कामामुळे मला ऑफिसमध्ये नाही जाता आले. माझ्या मुलीची बालसंगोपन योजना बंद करण्यात यावी.

Update: 2024-02-14 11:36 GMT

आपल्या आयुष्यात आपण अनेक नौकरदारांना बघतो. शिक्षण आणि अभ्यासाच्या जोरावर अनेकजन यश संपादन करतात. पैसे कमावतात ऐश करतात आणि काळाच्या पडद्याआड जातात. खऱ्याअर्थाने तीच लोक आपल्या लक्षात राहतात जी लोक इतरांची प्रेरणा बनतात. आम्ही अशाच एका प्रेरणेची कहाणी घेऊन आलो आहोत.

मोनिका शिंदे नावाच्या एकल महिलेची अनुकंपा मधून नियुक्ती होऊन तिला नौकरी लागते. तिच्या मुलांना बालसंगोपन योजना लागू आहे. ही बालसंगोपन योजनेची मदत पुढील एक वर्षात बंद होणार होती, मोनिका शिंदे यांच्या मुलांना वर्षभर 4500 रुपये मिळाले असते. पण नोकरीमुळे तिच्या उत्पन्नात वाढ होते आणि ही महिला प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत लगेचच बालसंगोपन योजना कार्यालयाला कळवून आपली योजना बंद करण्याची विनंती करते.

मोनिका शिंदे म्हणते ,''सर मी मोनिका शिंदे, राहणार केडगाव, अहमद नगर.माझी चार महिन्यापूर्वीच अनुकंपा मधून नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झाल्यापासून मी 3-4 वेळा बालसंगोपन ऑफिसला कॉन्टॅक्ट केला पण माझा फोन उचलला नाही आणि कामामुळे मला ऑफिसमध्ये नाही जाता आले. माझ्या मुलीची बालसंगोपन योजना बंद करण्यात यावी.


 



मोनिका शिंदे हिच्या प्रामाणिकपणाने प्रेरीत होऊन जेष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी त्यांच्या सोशल मिडिया वर पोस्ट करतात ते काय म्हणतात जाणून घेऊया

हेरंब कुलकर्णी म्हणतात "आमची एकल महिला. तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागली. नोकरी काही खूप पगाराची नाही.तिच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. नोकरी लागल्यावर उत्पन्न वाढले. त्यानंतर एक लाख उत्पन्न मर्यादा असलेली योजना पुढील वर्षी बंद होईल. तोपर्यंत प्रत्येक महिन्याला तिला मुलांसाठी महिन्याला ४५०० रू मिळत राहिले असते...पण या महिलेने नोकरी लागताच लगेच कार्यालयाला कळवले....माझी योजना बंद करा..आमच्या महिला इतक्या प्रामाणिक आहेत.

ज्या देशात उद्योगपती कर्ज बुडवतात, शासनाच्या सुविधा घेतात..त्या देशातील सामान्य माणसे इतकी प्रामाणिक आहेत




 

उद्योगपती कर्ज बुडवतात, शासनाच्या सुविधा घेतात..त्या देशातील सामान्य माणसे इतकी प्रामाणिक आहेत असं मत व्यक्त करून

हेरंब कुलकर्णी यांनी सामान्य माणसांमधील प्रामाणिकपणा अधोरेखित केला आहे.

मोनिका शिंदेंच्या प्रामाणिकपणाची चर्चा सोशल मीडियावर आहे आणि अनेक लोक त्यांचे कौतुक करतायत. मोनिका शिंदेंची ही कृती तुम्हाला काशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा

Tags:    

Similar News