दसरा मेळाव्याचा वारसा पुढे नेणारी पंकजा..

महिलांसाठी राजकारणात संर्घषाची सिमाच नाही. राजकीय मेळाव्यांच्या गर्दीत महिला नेत्या मात्र मागे पडताना दिसल्या तरी पंकजा मुंडे मात्र याला अपवाद ठरतात. पंकजा मुंडेच्या मेळाव्याच्या इतिहासावर MaxWoman ने टाकलेला हा प्रकाश तुम्हाला कसा वाटतो ते वाचुन नक्की कळवा...

Update: 2022-10-04 13:46 GMT

राजकारणात टिकून राहण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागतो. त्यात महिलांना नवीन काय करायचं म्हंटल तर विचारूच नका.अनेक पक्ष व राजकीय नेते दसरा मेळावा घेतात. या सगळ्यात तुम्हला कोणी महिला दिसणार नाही. पण महाराष्ट्रत अशी एकमेव महिला आहे जी वडिलांच्या निधनानंतर दसरा मेळाव्याची हि परंपरा पुढे चालवत आहे. हा दसरा मेळावा बंद व्हावा म्हणून अनेक प्रयत्न झाले. पण संघर्षाचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे सर्वांना पुरून उरल्या...

दसरा मेळावा घेणारी राजकीय महिला कुणी आठवते का? असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या तोंडात चटकन एक नावे येईल ते म्हणजे पंकजा मुंडे. खर तर गेली अनेक वर्ष दसरा मेळावा म्हटलं की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव समोर येत होतं. आज पर्यंत जे काही दसरा मेळावे झाले त्यामध्ये प्रामुख्याने पुरुषांनी पुढाकार घेतल्याचे आपण पाहत आलो आहे. इतक्या महिला राजकारणात सक्रिय आहेत परंतु कोणतीही महिला अशा कार्यक्रमात पुढाकार घेताना महाराष्ट्राने पहिली नाही. या सगळ्यात एकमेव महिला आहे जी मागच्या अनेक वर्षांपासून दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहे. वडिलांच्या निधनानंतर दसरा मेळाव्याची ही परंपरा सुरू ठेवताना पंकजा मुंडे यांना अनेक अडचणी आल्या या सर्व चढउतारांवर मात करत पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचा वारसा आजही चालू ठेवला...

११ ऑक्टबर २०१६ दसऱ्याचा दिवशी काय घडले..?

११ ऑक्टबर २०१६ दसऱ्याचा दिवस. पहिल्यांदा दसरा मेळावा भगवान गडावर होणार नव्हता. भगवान गडावर दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली असल्याचं फर्मान निघालं होतं . यामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला होता. आता काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सकाळ पासून लाखो लोक भगवान गडावर जमले. मोठं मोठ्याने घोषणा दिल्या जाऊ लागल्या. इतक्यात पंकजा मुंडे भगवान गडावर पोहोचल्या आणि त्या थेट भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या. आता भगवान गडावरील महंत व पंकजा मुंडे यांच्यात चर्चा होऊन काहीतरी तोडगा निघेल असं सर्वाना वाटतं होतं. यावेळी बाहेर अत्यंत तणावाचे वातावरण होते. काही वेळाने पंकजा मुंडे ज्या प्रकारे बाहेर आल्या त्यामुळे सर्वाना काहीच तोडगा निघाला नसल्याचं समजून गेलं. संपूर्ण समुदाय संतप्त अवस्थेत बेभान झाला. आता परिस्थतीत हाताबाहेर जाणार असं पोलिसांना वाटू लागले. यावेळी पोलिसांनाच शांत राहण्यास सांगत पंकजा मुंडे यांनी सर्वांना गडावरून खाली जाण्यास सांगितले. या वेळी कोणतीही एक चूक आणि अत्यंत भयानक परिस्तिथी निर्माण झाली असती. पंकजा मुंडेंनी संपूर्ण जमावाची जबाबदारी घेतली व अत्यंत संयमाने त्यांनी हि परिस्थिती हाताळली. ज्या ठिकाणी पंकजा मुंडेंचे हेलिपॅड होते त्या ठिकाणी सर्व लोक जमा झाले. हेलिपॅडच्या ठिकाणाने अक्षरशः सभेचे स्वरूप निर्माण झाले. त्यावेळी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होणार म्हणून सर्व मुंडे समर्थक नाराज होते. त्यामुळे सर्वजण अत्यंत आर्तपणे दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होणार नाही याचं आश्वासन पंकजा मुंडेंना मागत होते. त्यानंतर आजपर्यंत कधीच भगवानगडावर दसरा मेळावा झाला नाही. पण दसरा मेळाव्याची हि परंपरा आजही चालू आहे. वडिलांच्या निधनानंतर आजपर्यंत एकट्या महिलेने हि संपूर्ण ताकद जपून ठेवली आहे...

बीड जिल्ह्यातील भगवानगड या ठिकाणी श्री संत भगवान बाबा यांचे समाधी मंदिर आहे. दर वर्षी दसऱ्याला या ठिकाणी जाऊन समाधीचे दर्शन घेण्याची फार जुनी परंपरा आहे. याच परंपरेला जोडलेलं दुसरं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा. या दसरा मेळाव्याला लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक भगवान गडावर येत होते. एक दोन नाही तर तब्बल 30 वर्ष गोपीनाथ मुंडे यांचे शब्द ऐकण्यासाठी या ठिकाणी लोकांचा जनसागर उसळत होता.

अचानक गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला आणि...

2014 साली गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातात निधन झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या अशाप्रकारे अचानक झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या वर आली. त्यातील दसरा मेळावा एक मोठी जबाबदारी होती. पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा परंपरा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पण गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरून कोणतही राजकीय भाषण होणार नाहीत व पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा या ठिकाणी घेता येणार नाही असं फर्मान निघालं. या नंतर आता दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होणार का? या भीतीने मुंडे समर्थक अत्यंत बेचैन झाले. 2016 च्या दसऱ्या दिवशी भगवानगडावर लाखो लोक जमा झाले होते. त्यावेळी पंकजा मुंडे या सुद्धा भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी त्याठिकाणी आल्या. यावेळी त्यांच्यात आणि ट्रस्टचे महंत यांच्यात चर्चा होऊन काहीतरी तोडगा निघेल असं सर्वांना वाटत होतं. पण पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर परवानगी मिळाली नाही.

सावरगाव या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात

भगवानगडावर परवानगी नाकारल्यानंतर वातावरण अत्यंत संतप्त होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील सर्व परिस्थिती हाताळली आणि सर्वांना खाली जाण्यास विनंती केली. ज्या ठिकाणी हेलिपॅड बनवण्यात आले होते त्या ठिकाणी लाखो लोक जमले आणि तिथूनच पंकजा मुंडे यांनी लोकांना संबोधन केले. त्यानंतर दसरा मेळावा कुठे घ्यायचा हा मोठा प्रश्न पंकजा मुंडे यांच्या समोर होता. आणि अचानक पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं व यावर्षीचा दसरा मेळावा संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट येथे होणार असल्याचे सांगितलं. पंकजा मुंडे यांचा हा मोठा निर्णय होता. कारण त्यावेळी सावरगाव हे कुणाला माहित देखील नव्हतं पण त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं. 2017 चा दसरा मेळावा हा सावरगाव येथे पार पडणार होता. पाच लाख लोक येतील इतकी व्यवस्था करण्यात आली होती. लोक येतील की नाही याची चिंता सर्वच मुंडे समर्थकांमध्ये होती. पण 2017 च्या दसरा मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले.

वडिलांचा वारसा चालवणारी संघर्ष कन्या..

वडिलांचे निधन झाल्यानंतर सर्व जबाबदारी पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर आली. एक महिला म्हणून राजकारणात त्यांना आजवर अनेक अडचणी आले असतील पण या सर्वांना पुरून उरल्या त्या म्हणजे पंकजा मुंडे. आपण आज एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकत आहोत. पण वडील गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा टिकून ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांचा संघर्ष देखील मोठा आहे. त्यांच्या या संघर्षाची जाणीव दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी होतं राहील इतकं मात्र नक्की...

Tags:    

Similar News