'मी आणि माझी पाळी'
मासिक पाळीविषयी समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. खरतर 21 व्या शतकात पाळीवर बोलावं लागतं हेचं नवल आहे. पण खरंच पाळी इतकी विटाळ आहे का? पाळी येण्यात अपवित्र असं काय आहे? या सगळ्याच मूळ कारण आहे ते म्हणजे समाजात असलेले गैरसमज… ग्रामीण भागात महिलांच्या पाळीविषयी अनेक गैरमज आहेत..आजही तिथल्या मुली पाळीदरम्यान कापड व राखेचा उपयोग करतात. आता या सगळ्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे पाळीवर उघड बोलून प्रबोधन करणे व त्यांचे गैरसमज दूर करणे. त्यासाठीच सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी त्यांना पहिल्या पाळी दरम्यान आलेला अनुभव 'मी आणि माझी पाळी' या लेखात सांगितले आहेत. त्यांचा हा लेख नक्की वाचा..;
0