कोरोना महामारीच्या संकटाकामध्ये आता 'कँडिडा ऑरिस' च नवीन संकट; मृत्यूनंतरही नष्ट होत नाही

Update: 2021-07-24 06:32 GMT

जगभरात कोरोनाचे (coved19) संकट पाहायला मिळत असताना आता आणखी एक नवीन संकट अमेरिकामध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकामध्ये (America) 'कँडिडा ऑरिस' (Candida auris) हा संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे.




 


विशेष म्हणजे, 'कँडिडा ऑरिस' (Candida auris) हा फंगस एका शरीरातून तो दुसऱ्या शरीरात वेगाने पसरतो. तसेच माणसाच्या मृत्यूनंतरही नष्ट होत नाही. अमेरिकामधील डलास दोन आणि वॉशिंगनटच्या एका रुग्णालयाने कँडिडा ऑरिस  आजाराचे रुग्ण आढळल्याची माहिती सीडीसी (CDC) ने दिली आहे.




 

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना या आजारापासून अधिकचा असून, इतर रोगांच्या तुलनेत हा आजार अधिक घातक आणि संसर्गजन्य आहे.

वॉशिंगटन डीसी नर्सिंग होममध्ये 101 तर डलास येथील दोन रुग्णालयात 22 रुग्णांची नोंद झाली असून,दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे 'कँडिडा ऑरिस' (Candida auris) हा फंगस एका रुग्णांपासून दुसऱ्या रुग्णांपर्यत पसरत आहे.





 डॉक्टरांच्या मते 'कँडिडा ऑरिस' (Candida auris) फंगसवर आतापर्यंत कोणतेही औषध बनवण्यात आले नाही. तसेच या आजाराबाबत गोपनीयता ठेवण्यात आल्यामुळे लोकांमध्ये फंगसबाबत कोणतीही जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे.





 


Tags:    

Similar News