'नवीन' फिटनेस क्षेत्रातील वाटाडी..

Update: 2022-08-10 09:54 GMT

फिटनेस हा फक्त खेळाडूंनी मेंटेन ठेवला पाहिजे असा आपल्या काही लोकांचा समज आहे. खरं आहे मित्रांनो आजपर्यंत आपल्या इथे फिटनेस ( Fitness) बाबत म्हणावी तशी जागृती म्हणा किंवा त्याचे महत्व आपल्या लोकांना समजलं नाही, व त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्यात सुद्धा आपण कमी पडलो आहे. पण तेच महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तरुण धडपडतो आहे. खरं तर आज फिडन्सच्या नावाखाली बाजारात काय लूटमार चालू आहे हे आम्ही तुम्हाला सांगायला नको.. पण आता ज्या तरुणाची आम्ही ओळख करून देणार आहे त्याची सध्या फिटनेस क्षेत्रात मोठी चर्चा आहे. होय आपण नवीन ( Navieen ) या फिटनेसतज्ज्ञ (fitness expert) व वेटलिफ्टर (weightlifter) विषयी बोलत आहोत.. 'नवीन' आता फिटनेस या क्षत्रेत एक 'नवीन' आयडॉल बनतो आहे. आणि त्याच्या या प्रयत्नामुळे तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे..





 

लोकांची जनजागृती व त्यांना फिटनेसचे महत्व समजून सांगणे तर तो करतोच आहे पण या सोबत नवीनने आतपर्यंत अनेक गोरगरीब मुलांना वेटलिफ्टिंग (weightlifting) व पॉवरलिफ्टिंग (powerlifting) अशा खेळांचे पर्सनल ट्रेणिंग देऊन अनेक खेळाडू तयार केले आहेत. अगदी लहान वयात नवीनने या क्षेत्रात आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. त्याच्या संपूर्ण प्रवासावर तर आपण पाहूच पण त्या आधी आपण तो फिटनेस व एक यशस्वी ट्रेनर (fitness expert) म्हणून करत असलेल्या कामावर एक नजर टाकूया. नवीनने राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टर म्हणून स्वतःची विशेषता दाखवल्यानंतर आपल्या सारखे अनेक खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने फिटनेसज्ञ आणि प्रशिक्षक म्हणून अनेकांना घडवण्याचे तो काम करतो आहे..

या क्षेत्रात येताना त्याने इतरांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतः काही विशेष कौशल्य संपादन करून या क्षेत्रात यश मिळवले आहे. एखाद्या क्षेत्रात आधीपासूनच प्रस्थापित अनेक लोक असताना सुद्धा नवीनने या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. फिटनेसतज्ज्ञ व एक ट्रेनर म्हणून आत्तापर्यंत त्याने केलेल्या या यशस्वी वाटचालीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जे धैर्य दाखवलं आहे ते अविश्वसनीय आहे. फिटनेस इंडस्ट्री (Fitness Industry) मध्ये त्याने आजवर अनेक प्रतिभावान खेळाडू व अनेकांना जीवनाचा एक नवा मार्ग दाखवल्यानंतर आज या क्षेत्रात त्याने स्वतःच एक वेगळे नाव निर्माण केले आहे.




 


नवीन यांचा एकच उद्देश आहे फिटनेस आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राशी निगडित काम करणे.. इतकाच काय तो लोकांना आयुष्यात तंदुरुस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करतो. आज तो अनेकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारे प्रशिक्षण देतो आहे. त्याने आजपर्यंत घडवलेल्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळी[र्यंत यश मिळवले आहे. मुलांना खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी त्याची नेहमीच धडपड सुरु असते. आज देखील त्याचाकडे प्रशिक्षण घेण्यासाठी अगदी ग्रामीण भागातून अनेक मुलं येत असतात. देशासाठी असे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत म्हणून तो त्यांच्याकडून अत्यंत कमी शुल्क घेऊन त्यांना प्रशिक्षण देतो. यासाठी त्यांचा खास 'ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग' हा कोर्स सुद्धा आहे.

त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याने कामाप्रती दाखवलेल्या आवडीमुळे आज तो फिटनेसच्या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचला आहे. हे सर्व त्यांने स्वतःच्या जिद्दीवर आणि अफाट परिश्रमामुळे उभं केलं आहे. या सर्व गोष्टींमुळे अनेकांच्या फिटनेस या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या समस्या परवडणाऱ्या किमतींमध्ये पूर्ण करणारा नवीन हा आज फिटनेस प्रशिक्षक म्हणून इथपर्यंत पोहोचला आहे.

लोकांना त्यांच्या गरजेनुसार शारिरीक तंदुरुस्तीचे ध्येय गाठण्यासाठी आणि ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी लागेल ती मदत देणारे या क्षेत्रातील अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे नवीन. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांना @raonaveen108 या इंस्टाग्राम हॅन्डलवर फॉलो करा.


Full View

Tags:    

Similar News