वेंगुर्ला शुन्य कचरा मॉडेलचा समावेश CBSE पाठ्यपूस्तकात

Update: 2022-02-05 15:51 GMT

देशभरात गाजलेल्या वेंगुर्ला शुन्य कचरा मॉडेलचा CBSE च्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. इयत्ता ६ वीच्या विज्ञानाच्या पाठ्यपूस्तकात करण्यात आला आहे. वेंगुर्ला नगरपरीषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात शुन्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली होती. या मोहिमे अंतर्गत बायोगॅसनिर्मिती, कचऱ्यापासून खतनिर्मिती, रस्तेनिर्मिती ही कामे केली गेली होती. त्यांच्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरचा पूरस्कार देखील मिळाला होता.

पाठ्यपूस्तकात त्यांच्या या प्रकल्पाचा समावेश झाल्याने येणाऱ्या नव्या पिढ्यांना कचरा व्यवस्थापनेचे धडे नव्याने मिळणार आहेत. रामदास कोकरे हे सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. या पूर्वी त्यांनी वेंगुर्ला, माथेरान आणि कर्जत यासारख्या नगरपरिषदांचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Tags:    

Similar News