"आम्हाला फक्त याच जातीतली एँकर हवी आहे ", या प्रसिध्द अभिनेत्रीने फोडली वाचा
आतापर्यंत आपण म्हणत होतो की कलेला कोणतंही क्षेत्र नसतं परंतू तसं नाहीये. आता कलेलाही जातीची गरज पडू लागलीये. असाच प्रकाराला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री शिवानी धर सेन यांना सामोरं जावं लागलंय. त्यांना थेट एका विशिष्ट जातीतीलच मुलगी सुत्रसंचालक म्हणून हवी असल्याचं म्हटलं आहे. शिवानी यांनी या चॅटचे स्क्रिनशॉट्स काढून शेअर केलं आहे आणि तत्वांपेक्षा काहीच महत्त्वाचं नसतं असं ट्विट केलं आहे.
शिवानी यांनी, "हे माझं हैद्राबाद बाहेरील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी झालेलं चॅट आहे. तत्वांपेक्षा काहीही महत्वाचं नसतं हे या चॅट ने शिकवलं" असं म्हणत ट्विट केलं आहे. सोबत त्यांनी त्या चॅटचा स्क्रिनशॉट त्यांनी अपलोड केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये असं काय आहे ते आता आपण पाहूयात.
यामध्ये समोरील कंपनी शिवानी यांच्याकडे "कुणी कॉर्पोरेट एँकर आहेत का? फक्त एका विशिष्ट जातीतलीच हवी आहे.(इथे आम्ही जातीचा उल्लेख टाळतोय.)
यावर शिवानी त्यांना प्रश्न कळाला नाही म्हणून सांगतात.
त्यावर समोरील कंपनी, "ग्राहकांना फक्त या विशिष्ट जातीतील मुलगीच हवी आहे" असं सांगतात.
यावर शिवानी त्या जातीचा उल्लेख करत "ही जात आहे का?" असं विचाररतात.
समोरून होकार आल्यानंतर शिवानी त्या कंपनीसोबत काम करण्यास नकार देतात. यावर समोरील कंपनी फक्त "कूल सिस" असं उत्तर देतात.
मग शिवानी त्यांना नकार देण्याचं, "क्षमा करा पण मी कूठल्याही प्रकारचा जातीभेद आणि धर्मभेद मानत नाही" असं कारण सांगतात.
शिवानी या पैशांसाठी मनाला मुरड घालून ते काम करू शकल्या असत्या परंतू त्यांनी तसं न करता आपल्या तत्वांना अग्रस्थानी ठेवून कंपनीला नकार दिला आणि एक आदर्श सर्वांसमेर ठेवला. तसेच तत्वांपेक्षा काहीच महत्वाचं नसतं हे पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
कोण आहेत शिवानी धर सेन?
शिवानी धर सेन या भारतातील आघाडीच्या थेट होस्टपैकी एक आहेत. त्यांनी IT इंडस्ट्रीमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि मॉडेलिंग आणि अँकरिंगमध्ये नाव मोठं केलं. 2005 मध्ये त्यांनी पहिला कार्यक्रम होस्ट केला. त्यांनी आतापर्यंत 1500 हून अधिक थेट कार्यक्रमांचे अँकरिंग केले आहे. मग ते सरकारी कार्यक्रम असोत, परिषदा असोत, फॅशन शो असोत, कॉर्पोरेट कार्यक्रम असोत, विवाहसोहळा असोत किंवा मीडिया इव्हेंट असोत. प्रेक्षक आणि कार्यक्रमाच्या प्रकारानुसार त्या त्यांची शैली ठरवत असतात. रंगमंचावर त्यांची केवळ उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेते आणि कार्यक्रमाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते.