'द विझार्ड' मेजर ध्यानचंद यांची कारकीर्द कशी होती...ऑलिम्पिकमध्ये 23 गोल करत जिंकले होते सुवर्णपदक

त्यांनी अनवाणी पायाने मैदानात उतरून भारताला जिंकून दिले होते सुवर्णपदक...

Update: 2021-08-29 07:59 GMT

संपूर्ण देशभर भारताचे नाव करणारा एक महान हॉक पट्टू होऊन गेला. या खेळाडूकडे असे कौशल्य होते की, ज्यावेळी तो ग्राउंड वरती खेळायचा त्यावेळी अनेकांना बॅाल हॉकी स्टिकला चीकटला आहे की काय अशी शंका येत होती. हा खेळाडू म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद. आज जागतिक क्रीडा दिवस आहे. जागतीक क्रीडा दिवस हा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण देशभर साजरा होतो. आपल्या सर्वांना मेजर ध्यानचंद हे नाव माहिती आहे परंतु अनेक लोकांना त्यांच्याविषयी खुपच अत्यल्प माहिती आहे. तर कोण होते हे मेजर ध्यानचंद ? आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेली कामगीरी काय होती हेच आता आपण पाहणार आहोत...

'द विझार्ड' अशी ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय खेळात चारशेहून अधिक गोल केले आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आले आहे. तर अशा हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणार्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबाद येथील रामेश्वर दत्तसिंग या ठिकानी झाला. त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मी मध्ये काम करत होते आणि त्याच ठिकाणी त्यांना सर्वप्रथम हॉकी हा खेळ खेळायला मिळाला. त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे पंजाब रेजिमेंट मध्ये सैनिक म्हणून भरती झाली. भरती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष हे हॅकीवर केंद्रित केले. त्याठीकाणी त्यांना प्रशिक्षक म्हणून पंकज गुप्ता भेटले. खरतर सुरूवातीला त्यांचे नाव हे ध्यान सिंह असे होते पण प्रशिक्षकांनी ध्यानचंद यांना 'तु संपूर्ण जगभर एक दिवस चंद्रासारखा झळकशील' असे म्हटले. आणि त्यानंतर त्याच्या मित्रांनी ध्यान सिंह यांचे नाव ध्यानचंद असे झाले.

काशी होती मेजर ध्यानचंद याची संपूर्ण कारकीर्द

1926 मध्ये ध्यानचंद यांची न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत 192 गोल केले. ज्यापैकी 100 गोल एकट्या ध्यानचंद यांनी केले होते. या स्पर्धेनंतर त्यांचे प्रमोशन सुद्धा झाले होते. त्यानंतर 1995 साली ते पहिली राष्ट्रीय हॉकी स्पर्धा खेळले आणि त्यात केलेली कामगिरी पाहून त्यांची लगेचच आंतरराष्ट्रीय हॉकी संघात निवड करण्यात आली.त्यानंत 1928 ला अ‍ॅमस्टरडॅम याठिकाणी झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत आपला फायनल सामना हा नेदरलँड सोबत होता त्यांनी 2 गोल केले आणि भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 1932 मधल्या ऑलम्पिक या लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडला त्यावेळी अमेरिकेचा भारताने दणकून पराभव केला. या सामन्यात भारताने 23 गोल केले होते. या ठिकाणी देखील भारताने सुवर्ण कामगिरी केली होती. त्यानंतर 1932 मध्ये बर्लिन मध्ये झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताने जर्मनीला 8 -1 ने हरवून सुवर्ण पदक जिंकले होते. याच सामन्यात ध्यानचंद अनवाणी पायाने खेळले होते. ही मॅच बघण्यासाठी हिटलर देखील उपस्थित होते या मॅचनंतर त्यांनी मेजर ध्यानचंद यांना जर्मन सैन्यात उच्च पदाची ऑफर दिली होती पण त्यांनी ती ऑफर नम्रपणे नाकारली होती. आशा या महान हॉकीपटूचा मृत्यू यकृताच्या कर्करोगामुळे दिल्ली या ठिकाणी 1997 मध्ये झाला.

Tags:    

Similar News