Mother Teresa Birth Anniversary: मानवतेसाठी आयुष्य वाहिलेल्या भारतरत्न मदर टेरेसा.

Update: 2023-08-26 06:57 GMT

1) आज मदर तेरेसा यांची जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जग त्यांचे स्मरण करत आदरांजली वाहत आहे. मदर तेरेसा ह्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी समर्पित केले होते. मदर तेरेसा यांच्या विचारांनी समाजात शांतता आणि प्रेम टिकवून ठेवण्याचे काम केले आहे. १९७९ साली त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले.



2)मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी अल्बेनियामध्ये झाला. ती 18 वर्षे अल्बानियामध्ये राहिली, त्यानंतर ती आयर्लंडला गेली. कुष्ठरोगासारख्या आजारांनी ग्रस्त लोकांची त्यांनी सेवा केली. त्यांच्या या कलाकृतींनी त्यांना जगभर ओळख मिळवून दिली.



3)कोलकात्यातील मुलींच्या शाळेत सुरुवातीला शिक्षिका आणि नंतर प्राचार्य म्हणून सिस्टर तेरेसा यांनी वीस वर्षे काम केले.कोलकात्यात फिरताना रस्त्यावर भीक मागणारे महारोगी, फूटपाथवर अखेरच्या घटका मोजणारे आजारी वृद्ध यांची स्थिती पाहून सिस्टरना कळवळा येत असे. या पदलितांसाठी आपण काही करू शकत नाही या जाणिवेने त्या अस्वस्थ होत. कोलकात्यातील झोपडपट्ट्यांमधील लोकांची सेवा करण्यासाठी लॉरेटो संस्था सोडून स्वत:ची नवी संस्था स्थापन केली पाहिजे, असे 1939 नंतर त्यांना तीव्रतेने वाटू लागले. लॉरेटो संस्थेच्या सिस्टर असताना तेरेसा सफेद पायघोळ झगा, डोक्यावरून कमरेपर्यंत पडणारा काळा गाऊन असा पोशाख करत असत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ही नवीन संस्था स्थापन केली.



4) 17 ऑक्टोबर 1979 रोजी मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही देण्यात आले आणि 1980 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला. मदर तेरेसा या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’संस्थापक होत्या, मदर तेरेसा यांचे मूळ नाव ॲग्नेस गोंक्झा बोजाक्किऊ.



5) मदर तेरेसा यांच्या हयातीत मिशनरीज ऑफ चॅरिटीचे कार्य विस्तारत राहिले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते 123 देशांमधील 610 मोहिमांवर नियंत्रण ठेवत होते. यामध्ये एचआयव्ही/एड्स, कुष्ठरोग आणि क्षयरोग असलेल्या रुग्णांसाठी धर्मशाळा/घरे तसेच सूप किचन, मुले आणि कुटुंबांसाठी समुपदेशन कार्यक्रम, अनाथाश्रम आणि शाळा यांचा समावेश होता.



6) मदर तेरेसा गरीब आणि निराधारांची सेवा म्हणून मदर टेरेसा यांनी अवघं आयुष्य खर्ची केलं. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून मदर टेरेसा यांना 'नोबेल' या जागतिक पातळीवरच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यातही आलं. आई म्हणजे विश्वरुप असं आपण म्हणतो. एक आई अशीही होती जी खरोखरी विश्वरुपी म्हणून जगाने पाहिलं. एका 'मदर' ने आपल्या लेकरांची काळजी अशा प्रकारे घेतली . अवघ्या जगाने त्या आईला मग ‘मदर टेरेसा’म्हणून ओळखलं. मदर तेरेसा यांना १९७९ मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळाले. त्यांनी $१९२,००० पुरस्काराची रक्कम भारतातील गरीबांना मदत करण्यासाठी वापरली जावी अशी विनंती केली.२६ ऑगस्ट रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त (मदर तेरेसा जयंती) आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले जात आहे.





 


 


 



 


 


 


 

 


Tags:    

Similar News