गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर, ट्रक गेला वाहून, तीन जणांचा मृत्यू

Update: 2022-07-10 10:22 GMT

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 3 जण आलापल्लीवरुन भामरागडला जात होते, त्यावेळी ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ ही घटना घडली आहे.मृतदहे सापडले आहेत.

हा ट्रक आलापल्लीवरुन भामरागडला जात होता, त्यावेळी ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला. गावाजवळ एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पुलावरुन पाणी जातं असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पुलावरील पाणी ओसरु लागल्याचं बघून ट्रक ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली.

मात्र, मध्यभागी पोहोचल्यावर लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना मध्यरात्रीची असून, घटनेची माहिती मिळताच आज सकाळी SDRF च्या टीमने शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली. दरम्यान 3 मृतदेह मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे, अजून गाडीत प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News