'आहो...सोनं स्वस्त झालंय' असे आवाज आज अनेक घरात ऐकायला येतील

मुंबईत दहा ग्रॅम सोन्याचा दर 45 हजार 300 रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात कालच्यापेक्षा 300 रुपयांची घसरण...

Update: 2021-09-24 02:05 GMT

मागील वर्षात सोन्याच्या दराने अत्यंत उच्चांकी गाटली होती. मागील वर्षी सोनं 58 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये सोनं स्वस्त होत असल्याचं दिसतंय. या आठवड्यात देखील सोन्याच्या दरातील घसरण पुन्हा पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात घसरण जरी होत असली तर ती अत्यंत नगण्य अशी आहे. मागच्या दोन महिन्यांचा विचार केला तर साधारण 500 ते 600 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या मुंबईत सोन्याचे दर हे स्थिर असल्याचे अनेक सराफ व्यावसायिकांकडून सांगितले जातं आहे.

दसरा, दिवाळी हे सण आता तोंडावर आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वाढू शकतात अशी देखील चर्चा सध्या सराफ व्यवसायिकांमध्ये आहे. आज मुंबईत दहा ग्रॅम सोन्याचा दर 45 हजार 300 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत 60 रुपयाने स्वस्त झाल्याचं दिसतंय. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 46 हजार 300 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये एक किलो चांदीचा दर आज 60 हजार 600 रुपये इतका आहे. चांदीच्या दरात कालच्या पेक्षा 300 रुपयांची घसरण ही पाहायला मिळतील. तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्या नेहमीच्या सराफाकडे जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.

Tags:    

Similar News