पूरग्रस्तांना शाळा-मंदिराचा असारा मात्र स्वच्छालय नसल्याने महिला त्रस्त

Update: 2021-07-22 09:58 GMT

गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण मधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तर कल्याणचा वालधुनी परिसरात वालधुनी नदीचे पाणी घुसल्याने शेकडो लोक बेघर झाले आहेत. काही नागरिकांना महापालिकेकडून सुखरूप बाहेर काढून त्यांची राहण्याची व्यवस्था मंदिर आणि शाळांमध्ये करण्यात आली आहे.

तर काही नागरिकांनी स्वता आपला जीव वाचवून आजूबाजूला आसरा घेत पाणी कमी होण्याची वाट बघत आहे. नेमकी याची पालिकेने कशा प्रकारे व्यवस्था केली आहे हे पाहण्यासाठी या पूरग्रस्तांना स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी भेट दिली, तसेच परिसराची पाहणी देखील केली. मात्र मंदिरात ज्या बेघरांना राहण्याची सोय केली आहे त्या ठिकाणी शौचालय नसल्याने तेथील आश्रयीत महिलांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.

तर महापालिका स्वच्छ अभियान आणि नागरिकांसाठी ठिकठिकाणी शौचालय उपलब्ध केल्याचे दावा करते आणि आश्रयितांना मात्र अशाप्रकारे त्रास होत आहे याबाबत स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी खंत व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News