दिपाली सय्यद किरण मानेच्या मदतीला

Update: 2022-01-16 05:16 GMT

अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्यानंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. किरण माने यांना या स्टार प्रवाह वरील ' मुलगी झाली हो' या मालिकेतून काढल्यामुळे अनेक राजकीय पक्ष व कलाकार देखील आपला संताप व्यक्त करत आहेत. अभिनेत्री व शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील एक ट्विट करत 'कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही. किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल.' असं म्हटलं आहे.

प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांना मागच्या काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढण्यात आले. त्यांनी राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकलं असा आरोप होत आहे. यावरून आता राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याच दिसत आहे. राष्ट्रवादीने देखील ही मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे. किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर विरोधक केंद्रातील भाजपवर चांगलेच आक्रमक झाले आहेत.


शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी देखील आपली भूमिका मांडले आहे. त्यांनी ट्विटरवर ती एक पोस्ट शेअर करत 'कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही. किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल.' असं म्हंटला आहे.



Tags:    

Similar News