पुण्यात भाजीपाला खरेदीसाठी आहेत 'हे' नियम

Update: 2020-03-25 03:23 GMT

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी देशभरात २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मात्र, या काळात अत्यावश्यक सुविधा सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्रस्त होऊन अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा साठा करण्याची आवश्यता नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

पिंपरी चिंचवड येथे पोलिसांनी नागरिकांना भाजी खरेदीसाठी अतिशय उपयुक्त आणि सुरक्षित अशी व्यवस्था केली आहे. भाजीविक्रेत्यांना काही ठराविक काळासाठी आपली दुकान मांडण्याची मुभा देण्यात आलीय, पण, सुरक्षेची पुर्ण काळजी घेताना प्रत्येक नागरिकाला नियम घालून दिले आहेत.

नागरिकांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी एक मीटरहून अधिक अंतराचे चौकोन आखले आहेत. जेणेकरून कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही. हा कल्पना सर्वत्र वापरात आणणं फारच फायदेशीर ठरेल.

२१ दिवस कडकडीत बंद पाळला जाईल अशा गैरसमजामुळे अनेक नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी सर्वांनी किराणा आणि भाजीपाल्य़ांच्या दुकानांसमोर एकच गर्दी केली होती. दुध, भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर तत्सम जीवनावश्य़क वस्तूंसाठी सुनियोजित व्यवस्था तसेच पर्याप्त साठा उपल्ब्ध असल्याचं सरकारने सांगितलं आहे.

Similar News