Home > 'चंद्रकांतदादा विरोध कुठे आणि कधी करायचा पुणेकरांकडून शिका'

'चंद्रकांतदादा विरोध कुठे आणि कधी करायचा पुणेकरांकडून शिका'

चंद्रकांतदादा विरोध कुठे आणि कधी करायचा पुणेकरांकडून शिका
X

कोरोनाच्या संकटकाळात भाजपने सरकारला जाग करण्यासाठी 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन केलं. या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी आपला विरोध दर्शवताना भाजपने राजकारण न करता सरकारला संकटावर मात करण्यासाठी सूचना देणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.

हे ही वाचा...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या आंदोलनावर निशाणा साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांना "चंद्रकांतदादा कोल्हापूरवरून पुण्यात आले पण त्यांना विरोध कधी कुठे आणि कोणत्या वेळी करायचा हे पुणेकरांकडून शिकायला पाहिजे." असा टोला लगावला आहे.

सोबतच "सध्याच्या कठीण काळात तुमचं महाराष्ट्रासाठी तेवढंच योगदान आहे जेवढ योगदान तुमची मातृसंघटना असलेल्या RSS चं भारताच्या स्वातंत्र्यासाठी होतं... एकदम शून्य" अशी उपरोधक टीका सुद्धा त्यांनी केली.

रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाही खडे बोल सुनावले,

सध्या महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे महाराष्ट्र सरकारचे मंत्री, आरोग्य सेवक, पोलिस सनदी अधिकारी, डॉक्टर अक्षरक्ष: घरावर तुलसी पत्र ठेऊन महाराष्ट्राची काळजी घेत आहेत. शरद पवार यांच्या मार्गेदर्शनखाली उद्धव सरकार सर्व परीने चांगले काम करत असताना अशा कठीण समयी महाराष्ट्र भाजपा नेते राजकारण करत आहेत.

महाराष्ट्र सरकारने 4773 मदत केंद्रामार्फत आतापर्यंत परराज्यातील ४ लाख ७६ हजार कामगार निशुल्क त्यांच्या राज्यात पाठवले आहेत. १ कोटी ५२ लाख शिधा पत्रिका धारकांना राशन पुरवले असून बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये, आशा वर्कर- अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता अशी उपयोगी कामे महाविकास आघाडी करत आहे. काही लोकांना हेच कार्य खूपत असून ते अशाप्रसंगी 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं हे काळं राजकारण महाराष्ट्रातील जनता कधी विसरणार नाही.

https://www.facebook.com/rupali.chakankar/videos/3078411718915797/?t=0

हे ही वाचा...

Updated : 23 May 2020 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top