Home > ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन फेल करणारी तीन पक्षांची ‘ट्रोल आर्मी’

‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन फेल करणारी तीन पक्षांची ‘ट्रोल आर्मी’

‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन फेल करणारी तीन पक्षांची ‘ट्रोल आर्मी’
X

लॉकडाऊनच्या काळात विरोधीपक्षाने सरकारला जाग करण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं. भाजपच्या वतीने काल काळे कपडे आणि पट्ट्या बंधून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करण्यात आलं. मात्र, हे आंदोलन सोशल मीडियावरील नेटकऱ्य़ांच्या प्रतिसादामुळे आणि ट्रोलींगमुळे अधिक चर्चेत राहिलं.

हे ही वाचा...

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, अशिष शेलार, महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर मोठ्या प्रमाणात ट्रोलींग करण्यात आलं आहे. हे नेटीझन्स नसून महाविकासआघाडी ची ‘ट्रोलींग आर्मी’ आहे असं मत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केलं आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या भाजपवर आता कोणीतरी दुसराच मात करताना दिसत आहे. चित्रा वाघ यांच्या म्हणण्यानुसार ट्रोल करणारे नेटीझन्स नसून खरंच एखादी ट्रोल आर्मी असेल तर, भविष्यात सत्ताधारी आणि विरोधकही जमीनी पातळीवर काम करणार नसून फक्त सोशल मीडिया वॉर करताना दिसतील.

२०१४ निवडणुकांपासून भाजपने सोशल मीडियाच्या माध्यामातून होणाऱ्या प्रचारावर एकहाती वर्चस्व गाजवलं होत. मात्र, आता परिस्थिती बदलत असून बहुचर्चित भाजपच्या आयटी सेलवर कोणीतरी मात करताना दिसत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हे ही वाचा...

Updated : 23 May 2020 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top