Home > पंकजा मुंडेनी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाकडे का फिरवली पाठ?

पंकजा मुंडेनी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाकडे का फिरवली पाठ?

पंकजा मुंडेनी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाकडे का फिरवली पाठ?
X

आज राज्यभरात भाजपकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र या आंदोलनाकडे कार्यकर्त्यांनी चांगलीच फिरवली असून कोरोनाच्या या संकटकाळात कोणत्याही राजकीय डावपेचांना बळी पडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनाकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सपशेल पाठ फिरवली आहे. यावरुन भाजपमधील अंतर्गत वाद अजूनही मिटले नसल्याचं दिसून येतंय.

हे ही वाचा...

विधानपरिषदेसाठी संधी न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमधील कटूता अजूनही कमी झाली नाही. एकनाथ खडसे (Eknath Khadase), चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule) यांनीही या आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रीया अद्याप दिली नाही. मात्र, विनोद तावडे यांना आपल्याकडे वळवण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना यश आल्याचं दिसून येतंय.

पंकजा मुंडे यांना ठाकरे सरकारला विरोध दर्शवण्याची शक्यताही फार कमीच आहे. कारण पंकजा यांनी यापुर्वीच मोकळेपणाने मुख्यमंत्री उद्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रशंसा केली होती. महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमध्ये तुलना केली होती.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की, “देवेंद्र फडणवीस स्वतः सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्वीट करायचे. पण उद्वव ठाकरेंचा कल वेगळा दिसतोय. मला वाटतं ते एक नवीन पायंडा पाडू शकतात. मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईन कारण लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची चांगलं काम करावं असं मला वाटतं."

पंकजा मुंडेंसोबत त्यांची बहिण खासदार प्रितम मुंडे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला नाही. मात्र, भाजपच्या सर्वच मोहीमांमध्ये त्या सहभागी होत नाही असं नाहीय. तर केंद्र स्तरावरुन राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये त्या सहभागी होत आहेत. थाळी वाजवणे, दिवेलावणी अशा मोहिमांपासून अगदी पीएम केयर फंड पर्यंत सर्वात त्या सहभागी आहेत. राज्य स्तरावरील भाजपच्या अंतर्गत वादात आता केंद्रीय नेत्यांनी लक्ष घालण्याच्या प्रतिक्षेत भाजपचे ज्येष्ठ नेते असावेत.

Updated : 22 May 2020 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top