Home > ‘चंद्रकांत दादांनी प्रॉमिस मोडलं’, पंकजा मुंडेंनंतर भाजपच्या ‘या’ महिला नेत्याही नाराज

‘चंद्रकांत दादांनी प्रॉमिस मोडलं’, पंकजा मुंडेंनंतर भाजपच्या ‘या’ महिला नेत्याही नाराज

‘चंद्रकांत दादांनी प्रॉमिस मोडलं’, पंकजा मुंडेंनंतर भाजपच्या ‘या’ महिला नेत्याही नाराज
X

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पक्षातील या नवीन चेहऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटतोय. विधानसभा निवडणुकीदरम्यान बहुचर्चित असा पुण्याच्या कोथरुड मतदार संघातील माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर नाराजी व्यक्त करताना अश्रू अनावर झाले आहेत.

हे ही वाचा..

चंद्रकांत पाटील यांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी पाटील यांना त्यांच्या शब्दांचीच आठवण करुन दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोथरुड मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील मतदारसंघाऐवजी सेफ सीट म्हणून त्य़ांना या जागेवर भाजपकडून उभं करण्यात आलं होतं. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी कोणताही पक्षीय वाद किंवा अंतर्गत राजकारण न करता चंद्रकांत पाटील यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणेनंतर “हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझा पहिला अधिकार होता, कारण मला अनेक वेळा प्रॉमिस केलं होतं. माझं नेमकं काय चुकलं हे पक्षाने सांगावं. माझं काय चुकलं हे मला माहीत नाही, आता मला काही पुन्हा संधी दिसत नाही.” असं सांगताना मेधा कुलकर्णीच्या डोळ्यात आलं पाणी.

मला तिकीट दिलं नव्हतं. मी पडलेली नव्हते, तर आश्वासन देऊन मला थांबवलं होतं. मी पक्षाची पंचवीस वर्षापासून कार्यकर्ती आहे. पक्ष कुठेच नसताना मी निष्ठेनं काम केलेलं आहे. वेगवेगळी प्रलोभने आली असतानाही मी पक्ष सोडला नाही. अत्यंत कठीण, वाईट परिस्थितीत पक्षाला मी विजय मिळवून दिला आहे, मला पक्षांवर दबाव आणता येत नाही, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी केली.

चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमी माझी चर्चा होत होती, आजही सर्व नेत्यांना मेसेज केले मात्र कोणाचाच रिप्लाय आला नाही, असं सांगताना कुलकर्णी यांना रडू कोसळले.

Updated : 9 May 2020 5:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top