Home > 'राक्षसासारखी काळी तोंडे करून माकडउड्या मारणारे कोरोनापेक्षा मोठे पाताळयंत्री'

'राक्षसासारखी काळी तोंडे करून माकडउड्या मारणारे कोरोनापेक्षा मोठे पाताळयंत्री'

राक्षसासारखी काळी तोंडे करून माकडउड्या मारणारे कोरोनापेक्षा मोठे पाताळयंत्री
X

आज राज्यभरात भाजपने ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संकटावर आळा घालण्यासाठी महाविकासआघाडी सरकार अपयशी ठरलं असून विरोधक म्हणून सरकारला जागं करण्याचं कर्तव्य पार पाडत असल्याची भुमिका भाजपने मांडलीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल या आंदोलनाची घोषणा केली.

हे ही वाचा..

मात्र, भाजपच्या या आंदोलनाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी “राक्षसासारखी काळी तोंडे करून अंगणात माकडउड्या मारणारे मला कोरोना विषाणूपेक्षा मोठे पाताळयंत्री वाटतात” अशा घणाघाती शब्दात समाचार घेतला आहे.

भाजपने ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ या घोषणेअंतर्गत महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरु केलं. या आंदोलनासाठी सर्वांनी काळे कपडे आणि काळ्या रंगाची पट्टी बांधून विरोध दर्शवला. यावर रुपाली चाकणकर यांनी “संपूर्ण महाराष्ट्र कोविड-१९ युद्धात रणांगणात उतरला असताना राक्षसासारखी काळी तोंडे करून अंगणात माकडउड्या मारणारे मला कोरोना विषाणूपेक्षा मोठे पाताळयंत्री वाटतात, अशा जहाल शब्दात रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे.” अशी टीका केली आहे.

Updated : 22 May 2020 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top