Home > #नथीचानखरा: सोशल मीडियावर का होतोय हा ट्रेंड व्हायरल?

#नथीचानखरा: सोशल मीडियावर का होतोय हा ट्रेंड व्हायरल?

#नथीचानखरा: सोशल मीडियावर का होतोय हा ट्रेंड व्हायरल?
X

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर सध्या #नथीचानखरा हा ट्रेंड तुफान व्हायरल होतो आहे. मराठी सीनेतारकाही यात मागे नाहीत. महिलांनी या ट्रेंडवर जरा जास्तच जोर दिलेला पाहायला मिळतो आहे. यापुर्वी साडीचा ट्रेंडही खुपच चालला होता आणि असे ट्रेंड चालणार का नाहीत हे देखील तितकच स्पष्ट आहे. अर्थातच आभुषण आणि साड्या म्हणजे महिलांचा आवडता विषय आहे.

हे ही वाचा...

गेल्या दोन महिन्यांपासून घरात कोणालाही न भेटता वेळ काढणं फारचं अवघड आहे. मग या काळात एकादं टास्क करुन आपल्या मित्र मैत्रिणींना त्या टास्कसाठी टॅग करुन एक साखळी बनवली जाते. विशेष म्हणजे हे टास्कही फारचं मजेदार असतात. त्यामुळे ते नाकारण्याचाही प्रश्न येत नाही.

नथीचा नखरा हा ही असाच काहीसा प्रकार आहे. यात महिलावर्ग वेगवेगळ्या पेहरावात छानशी नथ घालून आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. सध्या फेसबुक, ट्वीटर, इनस्टाग्राम, व्हाट्सएप स्टॅटस अशा सोशल मीडिया माध्यमांवर नथीचा नखरा ट्रेंड फोटोंचा पुर आला आहे. विशेष म्हणजे या ट्रेंडवर मीम्सही मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. हे मीम्स पाहणंही फार मजेशीर ठरतंय.

Updated : 22 May 2020 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top