Home > सोनाली कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा?

सोनाली कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा?

सोनाली कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा?
X

मराठी सीनेसृष्टीची सुप्रसिद्ध तारका सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने नुकताच आपल्या आयुष्यातील काही सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोनालीने नुकताच आपला साखरपुडा उरकला असून याची घोषणा तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून केली आहे. मात्र २ फेब्रुवारीला हा साखरपुडा उरकला होता. म्हणजे लॉकडाऊन संपेपर्यंत ती कदाचित विवाह बंधनात अडकण्याचाही निर्णय घेतील.

Courtesy : Social Media

सोनाली सोबत ज्या व्यक्तीच्या रेशीमगाठी जुळल्या आहेत त्याचं नाव आहे कुणाल बेनोडेकर.

Courtesy : Social Media

कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.

Courtesy : Social Media

कुणालचं शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं.

Courtesy : Social Media

त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.

Sonalee Kulkarni Got Engaged Courtesy : Social Media

लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सोनालीने काही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच्या भावी आयुष्य़ासाठी खुप खुप शुभेच्छा..

Updated : 19 May 2020 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top