Home > जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर तरुणास मारहाण, रुपाली चाकणकर म्हणतात...

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर तरुणास मारहाण, रुपाली चाकणकर म्हणतात...

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर तरुणास मारहाण, रुपाली चाकणकर म्हणतात...
X

फेसबुक आणि ट्वीटरवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात पोस्ट आणि अश्लील फोटो शेअर करण्यावरुन तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी “योग्यच केलं....आम्ही सोबत आहोत” असं म्हणत आव्हाडांची पाठराखण केली आहे.

कासारवडवली येथील तरुणाने वर्तकनगर पोलिस ठाण्यात जिंतेद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील 'नाद' बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर जिंतेंद्र आव्हाड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. सर्वसामान्य तरुणाला मारहाण केल्याबद्दल राजकीय स्तरावर जितेंद्र आव्हाड यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जातेय.

‘खुप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण. महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय’ असा आक्रमक पवित्रा घेत त्यांना आलेल्या वाईट अनुभवांबद्दल व्यक्त झाल्या आहेत.

“एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वाने नेतृत्व स्विकारत असेल, विचार मांडत असेल, तिची कार्यप्रणाली समृद्ध होत असेल, आणि तिच्यावर टीका करण्यासारखं हातात काहीच नसेल तर, तर तिच्या चारिञ्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम सोशल मिडीयाच्या माध्यमातून होतो.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

"समाजातील प्रत्येक क्षेत्रातील महिला आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ञास होतो. त्यांना सहकार्य करणारे बरोबर नाही, त्यांच्याकडे या अन्याया विरोधात लढण्याची क्षमता नाही... त्यांनी कोणाकडे आणि कितीदा न्याय मागायचा.? आता सुरूवात झालीच आहे तर होऊन जाऊ देत. आव्हाडसाहेब....आम्ही सोबत आहोत.' अशी ठाम भुमिका घेत रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांनी पाठींबा दर्शवला आहे.

Updated : 7 April 2020 7:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top