Home > ट्रम्प कन्येनं केलं बिहारच्या १५ वर्षीय ज्योती कुमारीच्या साहसाचं कौतुक

ट्रम्प कन्येनं केलं बिहारच्या १५ वर्षीय ज्योती कुमारीच्या साहसाचं कौतुक

ट्रम्प कन्येनं केलं बिहारच्या १५ वर्षीय ज्योती कुमारीच्या साहसाचं कौतुक
X

बिहारच्या १५ वर्षीय ज्योती कुमारी (Jyoti Kumari) च्या साहसाचं आणि प्रेमाचं कौतुक खुद्द अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची कन्या इवांका ट्रम्प (Ivanka Trump) यांनी केलं आहे. इवांका यांनी तिचा संघर्षपुर्ण प्रवास आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

बिहारच्या दरभंगामधील सिरहुल्ली गावात राहणारे हे बापलेक लॉकडाऊनच्या काळात गुडगावमध्ये अडकले होते. वडीलांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना कामही करणं शक्य नव्हतं. तीथे भुकेने मरण्यापेक्षा आपण आपल्या गावी जावं अशी इच्छा तीने वडिलांना सांगितली. हा प्रवास सायकलने करायचा असं तीने ठरवलं. सायकलच्या मागच्या सीटवर वडिलांना बसवून १२०० किलोमीटरचा खडतर रस्ता सात दिवस सायकल चालवत ज्योतीकुमारी ने पार केला होता.

हे ही वाचा...

लाइव्ह मिंट वृत्तसमुहाने दिलेल्या बातमीची दखल घेत इवांका यांनी तिच्या साहसाचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलंय की,

“15 वर्षांची ज्योतीकुमारी, तिच्या जखमी वडिलांना सायकलच्या मागे बसवून 7 दिवसात 1,200 किमी पेक्षा जास्त अंतरावर त्यांच्या गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या सुंदर पराक्रमामुळे भारतीय लोक आणि सायकलिंग फेडरेशनची कल्पनाशक्ती व्यापली आहे!”

ज्योतिच्या या साहसाची दखल मीडियाने घेतल्यानंतर देशभरात तिच्या नावाची चर्चा झाली. तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. ज्योती आठवीच्या वर्गात शिकत असून तिच्या शिक्षणाचा खर्च करण्याचीही इच्छा अनेकांनी व्यक्त केली. सोबतच सायकलींग फेडरेशन ऑफ इंडीयाने ज्योतीला पुढील महिन्यात ट्रायलसाठी बोलावलं आहे. तिच्या प्रवासाचा राहण्याचा सर्व खर्च फेडरेशन करणार आहे. सायकलींग फेडरेशनचे चेयरमन ओंकारसिंग यांनी तिला फोन करुन याबद्दल सांगितलं आणि आशिर्वादही दिले असं ज्योतीने म्हटलं.

Updated : 23 May 2020 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top