#Shweta : श्वेताने केलेली चूक तुम्ही करु नका..

“वो जब जब मिले उन्होने तब तब किया” वाल्या श्वेताची ऑडीओ क्लिप तुम्ही ऐकलीच असेल. त्या झूम मीटिंग मधील 111 ज्या कुणी श्वेताची ही ऑडीओ व्हायरल केली ते योग्य होतं का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा..

Update: 2021-02-19 14:15 GMT

"वो जब जब मिले उन्होने तब तब किया" वाल्या श्वेताची ऑडीओ क्लिप तुम्ही ऐकलीच असेल. त्यावरुन खुप सारे मीम देखील व्हायरल झाले पण मुद्दा हा येतो की, त्या झूम मीटिंग मधील 111 ज्या कुणी श्वेताची ही ऑडीओ व्हायरल केली ते योग्य होतं का?

आता तुम्ही म्हणाल जे झालं ते झालं त्या श्वेताला कळायला नको का? पण लोकहो माध्यम म्हणून लोकांना वेळीच सावधान करण ही जबाबदारी आहे.

आपला सर्वात जास्त वेळ आपण इंटरनेटवर घालवत असतो. त्यातच कोरोनामुळे सर्व बंद झालं आणि ऑफलानाइन कामं सुध्दा ऑनलाइन झाली. (उदा : शाळा, कॉलेज, क्लास) त्यामुळे या ऑनलाइच्या जगात वावरताना सावधानता देखील तेवढीच महत्वाची असते. नाहीतर श्वेता प्रमाणेच तुमची देखील खसगी माहिती लिक होवू शकते.

नेमकं प्रकरण काय?

झुम मीटिंगवर एक क्लास सुरु होता. यात श्वेता नावाची मुलगी देखील सहभागी झाली होती. या ऑनलाइन क्लास दरम्यान श्वेता तिच्या मैत्रीणीसोबत बोलत होती. या बोलण्याच्या नादात श्वेता माईक बंद करायला विसरली. आणि श्वेताच्या बोलण्याचा होता. 'लव्ह, सेक्स आणि धोका.' बरं, श्वेता बोलण्यात इतकी मग्न होती, की ऑनलाईन क्लासमध्ये असणाऱ्या इतर विद्यार्थांनी तिला, माईक बंद करण्यास सांगूनही तिच्या कानांवर हे शब्द पडले नाहीत. इथूनच ही 'श्वेता'ची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

त्यामुळे लोकहो तुम्ही जेव्हा या सोशल मीडियाच्या ऑनलाइन जगात वावरत असताना सतर्कता आणि सावधानता बाळगणं किती महत्वाचं आहे लक्षात घ्या...

Tags:    

Similar News